क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
धाराशिव / मुंबई - धाराशिव येथील आश्रम शाळा संस्था चालकांनी सामाजिक न्याय मंत्री व संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "तो व्हिडिओ पाहा, तो प्यायलेला दिसतोय. माझ्या विभागात आश्रम शाळा आहेत, त्यातील कर्मचारी, संस्था चालक यांचा प्रश्न प्रलंबित असल्याचं," ते म्हणाले.
"पगारवाढ होईल, सर्वांना स्पष्ट सांगितले आहे. कुणी पैसे मागितले तर गुन्हा दाखल करण्यात येईल."
"काही एजंट्स आहेत, ते पैसे घेतात. व्हायरल व्हिडिओवाले यांचे धंदे बंद झाले आहेत, त्यामुळं यांची पोटदुखी आहे. हे सगळे दलाल लोक आहेत. त्याची माहिती घ्या, कळेल तुम्हाला," असंही ते म्हणाले.
"संजय शिरसाट यांनी पीए भंडारी यांना पैसे गोळा करण्यासाठी ठेवलं आहे. दलित वस्ती सुधार योजनेमध्ये १५ लाख घेतले जातात. शाळांसाठी ३५ ते ४० लाख घेतले जात असल्याचा आरोप केला गेला."
"शिवाय संजय शिरसाट यांच्याकडे ७५ कोटींचा बंगला, पाच कोटींच्या गाड्या कुठून आल्या, याची चौकशी करा," असं धाराशिवमधील संस्थाचालक अरुण नीटोरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आरोप केला होता.
धाराशिवमधील केशेगाव या ठिकाणी रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा आहे. "केवळ पैसे नसल्यामुळे शाळा तीन वर्षांपासून बंद आहे. व्याजाने पैसे काढून शाळेची दुरुस्ती केल्याची माहिती," धाराशिव येथील संस्थाचालक अरुण निटुरे यांनी फेसबुक लाईव्ह करत दिली होती. त्यावरून शिरसाट बोलले आहेत.
"त्या माणसाचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल, की तो पिलेला होता की काय.."
"एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, माझ्या विभागामध्ये ज्या आश्रम शाळा आहेत, वसतिगृहे आहेत, जे कर्मचारी आहेत. १६५ संस्थाचालक आहेत, या सर्व लोकांचा गेल्या १२-१३ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे."
"त्यांना पगारवाढ देण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. यासाठी संभाजीनगरला मी एक बैठक घेतली होती."
"त्यांना सांगितलं होतं, जर कोणी कोणाला पैसा दिला असेल आणि वसूल केला असेल, असं मला कळालं, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करेन."
"काही जे लोक आहेत, ते एजंट आहेत. त्यांना फक्त वसुलीकरणच माहित आहे. ते सगळ्यांच्या दारोदारी फिरतात."
"मी तुम्हाला हेही सांगू शकतो की काही काही लोकांनी चेकने पैसे दिले आहेत. त्यामुळे अशा आरोपांकडं मी लक्ष देत नाही."
"मात्र यांची पोटदुखी ही आहे, त्यांचे दुकानदारी मी बंद केली. यापुढे माझ्या कानावर जरी आलं, या संस्थाचालकांनी कुठे पैसे दिले, कोणी पैसे मागितले, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील," असं ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपर फुटीमुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी नवी पेठमधील पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू केले आहे.
"याबाबत कमिटीमध्ये शिथिलता आहे, हे मान्य करावे लागेल. परीक्षा देतात, निकाल येतो मात्र जॉइनिंग लेटर मिळत नाही. खूप विलंब आहे. माझ्या खात्यात असे झाले आहे. त्यामुळे कुठल्या अधिकाऱ्यामुळे सरकार बदनाम होत असेल, तर त्यावर कारवाई व्हायला हवी," असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
"रोहित पवार नौटंकी करतो. कुठं ही जाऊन ५० लोकांसोबत आंदोलन करतो. तो विद्यार्थी, शेतकरी साठी आंदोलन करत नाही, तो अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. पत्रकाराला मारहाण केली," असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
दुष्काळ पंचनामे आणि सरसकट मदतीवर शिरसाट म्हणाले, "दुष्काळ पडतो त्यावेळी पंचनामे करावे लागतात. केंद्र शासनाच्या निकषानुसार ड्रोन मॅपिंग करावी लागते."
"सध्या शेतात पीक दिसतंय, पण त्याला कणीस नाही, कापूस नाही, सोयाबीन गेलाय. पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत, ते सरसकट होताय."
"शेतकरीने विचलित होऊ नये, मदत मिळणार आहे.." असेही शिरसाट यांनी म्हटले.
| मुद्दा | तपशील |
| आरोप | संस्थाचालक अरुण नीटोरे यांनी शिरसाटांवर केले |
| प्रत्युत्तर | 'व्हिडिओ पाहा, तो प्यायलेला' |
| संस्था | १६५; १२-१३ वर्षांपासून प्रलंबित |
| पगारवाढ | होईल; पैसे मागितले तर गुन्हा |
| एजंट | 'दलाल लोक आहेत' |
| पेपरफुटी | 'कमिटीत शिथिलता; कारवाई हवी' |
| रोहित पवार | 'नौटंकी करतात' |
| दुष्काळ | 'सरसकट पंचनामे होताय' |
| शेतकरी | 'विचलित होऊ नये' |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.