क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
नागपूर - नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग परिसरात हवेत गोळीबार (Firing) करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे.
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या (Nagpur Firing News) आवाजाने नंदनवन परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला असता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रोशन गायकवाड ऊर्फ गोट्या याला वणी येथून अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपीचा अधिक तपास केला असता आरोपीविरुद्ध पूर्वीचे नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे
दरम्यान, नंदनवन पोलिसांनी कारचा नंबर शोधून काढत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहे.
तर आरोपी रोशन गायकवाड यांचा हसनबाग येथील एका गुन्हेगाराशी वाद आहे. त्यातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले असून परिसरातील नागरिकांमध्ये सध्या काहीसे भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, नागपूर आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यातील पहिला गोळीबार २६ ऑगस्ट रोजी भांडेवाडीतील श्रावणनगर परिसरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज तपासून सात आरोपींना अटक केली होती.
त्यानंतर १० सप्टेंबरच्या रात्री नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोटाळ-पांजरी परिसरात पैशांच्या जुन्या व्यवहारातून झालेल्या वादातून गोळीबार झाला.
या घटनेत प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित कार्तिक धार्मिक हा जखमी झाला होता.
अशातच आता हसनबाग फ्लायओव्हरखाली सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री झालेल्या हवेत गोळीबारामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
गोंदिया शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रेल्वे स्टेशन परिसरातील राधिका लॉजवर अचानक छापा टाकून सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी लॉज मालकाला अटक केली असून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने राधिका लॉजवर पंचांसमक्ष छापा मारला.
यावेळी लॉज चालक व मालक जगदीश भामनानी (वय ५४) रा. हेमू कॉलनी चौक, यादव चौक, गोंदिया हा चार महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे रंगेहात आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून चारही पीडित महिलांची या पाशातून सुटका केली.
या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १४३ (२) (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९६५ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
| मुद्दा | तपशील |
| नागपूर गोळीबार | हसनबाग, मध्यरात्री हवेत गोळीबार |
| आरोपी | रोशन गायकवाड ऊर्फ गोट्या |
| अटक | वणी येथून |
| पूर्वीचे गुन्हे | ९ |
| कार चालक | गुन्हा दाखल; शोध सुरू |
| पहिली घटना | २६ ऑगस्ट – श्रावणनगर |
| दुसरी घटना | १० सप्टेंबर – गोटाळ-पांजरी |
| तिसरी घटना | हसनबाग |
| गोंदिया | राधिका लॉज; देहविक्री रॅकेट |
| आरोपी | जगदीश भामनानी |
| सुटका | ४ महिला |
| गुन्हा | BNS + अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.