⚡ ब्रेकिंग News

भरधाव मोटारसायकलची धडक; आजोबा व तीन नातवंडे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा


गोंदिरा-तळवळी परिसरातील अपघात; मोटारसायकलचेही नुकसान

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

आटपाडी, दि. २ ऑक्टोबर : भरधाव व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून दुसऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने आजोबा व त्यांची तीन नातवंडे जखमी झाल्याची घटना आटपाडी तालुक्यात घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात एका मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप दगडू गावडे (वय ६०, रा. गोंदिरा-तळवळी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय गोरख चव्हाण (रा. सागरमळा, ता. आटपाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील प्लॅटिना मोटारसायकल (एमएच १५ बीवाय १२७३) भरधाव व निष्काळजीपणे चालवून फिर्यादींच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात फिर्यादी दिलीप गावडे यांच्यासह त्यांची नात तनवी, हर्षदा आणि शौर्य हे जखमी झाले. तसेच मोटारसायकलीचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...