क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
नागपूर : नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात २० वर्षीय तरुणाने १७ वर्षांच्या मुलीला फुस लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोबतच या कृत्याबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणामांची धमकीही या २० वर्षीय तरुणाने दिलीय. परिणामी या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र एका कॅफेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्करदरा येथील समीर शेख नावाच्या आरोपीची पीडितेशी तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. आरोपीने २९ जुलै २०२६ रोजी नंदनवन परिसरातील 'एफ झोन' कॅफेमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या कृत्याबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणामांची धमकीही या २० वर्षीय तरुणाने दिलीय. परिणामी धमकीमुळे आणि भीतीमुळे पीडिता गप्प होती. मात्र आरोपीने त्रास देणे सुरूच ठेवल्याने तिने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
अखेर ४ ऑक्टोबरला आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणीसाठी दबाव आणला. यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
तर या संपूर्ण घटनेत कॅफेच्या भूमिकेचीही पोलीस चौकशी करत असल्याची माहिती नंदनवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत राठोड यांनी दिली आहे. कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ही अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी समीर शेख फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. तसेच, आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.
दुसरीकडे, वाशिमच्या मालेगाव आणि कारंजावरून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मालेगाव आणि कारंजा शहर पोलिसांनी आज दोन ठिकाणी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन ट्रक आणि दोन्ही ट्रकमधून तीन क्विंटल छुप्या पद्धतीने तस्करी केल्या जात असलेल्या जवळपास दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या या कारवाईचा अधिक तपास वाशिम जिल्हा पोलीस करत आहे.
नागपूरच्या नंदनवन परिसरातील कॅफेमध्ये १७ वर्षीय मुलीवर २० वर्षीय तरुणाकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने धमकी दिल्याने पीडिता गप्प होती. मात्र, ४ ऑक्टोबरला आरोपीने प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणीसाठी दबाव आणल्यानंतर पीडितेने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. कॅफेच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, समृद्धी महामार्गावर गांजा तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.