⚡ ब्रेकिंग News

समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावतीजवळ घडली घटना


 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १२७ वर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी घटना; फुलकोबी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अचानक टायर फुटला अन् ट्रकला आग; आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल; दुसरीकडे अमरावती-अकोला महामार्गावर ट्रकला भीषण आग, ट्रक पूर्णपणे जळून खाक; भरधाव ट्रकने कारला धडक, महिला चालक गंभीर जखमी; भंडाऱ्यात ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना, आरपीएफच्या तत्परतेने सुरक्षित प्रसूती

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीजवळच्या समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात अचानक टायर फुटल्याने ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. तर या भीषण आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे.

दरम्यान, आज (१२ ऑक्टोबर) सकाळी चॅनल क्रमांक १२७ वर एका ट्रकचा टायर फुटून ट्रक जळल्याने होरपळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. तर हा ट्रक फुलकोबी घेऊन वाहतूक करत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केलीय. मात्र समृद्धी महामार्गावरील या अपघाताच्या घटनेनं पुन्हा एकदा अपघातांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दुसरीकडे अशीच एक अपघाताची घटना अमरावती-अकोला महामार्गावर घडली आहे. यात एका ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. दरम्यान, महामार्गावर ट्रक जळल्याने महामार्गावर काहीकाळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक दुसऱ्या लेनवर वळल्यावर एकाच लेनवर वाहतूक सुरु होती. अशावेळी भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून जखमी कारचालक महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातून एक आनंददायी बातमी समोर आली आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने मुंबई येथून सकीना खातून या कुटुंबासह पश्चिम बंगालला निघाल्या होत्या. भंडाऱ्याच्या तुमसर रोड इथं रेल्वे पोहोचताचं त्यांना अचानक प्रसूतकळा आल्यात. याची माहिती भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे सुरक्षा उपनिरीक्षक एस. एस. ढोके व कर्मचाऱ्यांना मिळाली. यावेळी महिलेला तातडीनं स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सुरक्षित उतरवून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केलं. यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळं महिलेला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

समृद्धी महामार्गावरील या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आणला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टायर फुटणे, चालकाचे नियंत्रण सुटणे आणि भरधाव वेग ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या अपघातांनंतर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले असता, दुसऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न अनेक पक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने ट्रकला आग लागली आणि आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक फुलकोबी घेऊन जात होता. दुसरीकडे अमरावती-अकोला महामार्गावर ट्रकला भीषण आग लागली आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने महिला चालक गंभीर जखमी झाली. भंडाऱ्यात ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्यानंतर आरपीएफच्या तत्परतेने सुरक्षित प्रसूती झाली. या घटनांनी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...