⚡ ब्रेकिंग News

समुद्रात अडकलेल्या जहाजावर चोरी करायला गेले, चार जण जीव गमावून बसले! नेमकं काय घडलं?


  गोराई-मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या विदेशी जहाजात गॅस कटरने पाईप कापताना विषारी गॅस गळती; चौघांचा गुदमरून मृत्यू; हेलिकॉप्टरने पार्थिव बाहेर; आठ जणांची टोळी स्पीडबोटने गेली होती; तीन वेळा चोरी

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई - गोराई-मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात चोरी करायला गेलेल्या चार चोरट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईच्या बोरिवली पश्चिम गोराई येथील मनोरी बीचवर धक्कादायक घटना घडली आहे. समुद्रात अडकलेल्या विदेशी जहाजावर चोरी करायला गेलेल्या चार चोरट्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

चार महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे गोराई येथील मनोरी समुद्रकिनाऱ्यावर विदेशी जहाज येऊन अडकली होती.

हे जहाज चार महिन्यांपूर्वी मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकले होते.

या अडकलेल्या जहाजाची माहिती मिळताच मागील महिनाभरापासून या चोरट्यांच्या टोळीकडून दररोज चोरी सुरू होती.

मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी या चोरट्यांच्या टोळीकडून जहाजावर गॅस कटरने गॅस पाइपलाइन कापून चोरी करायचे प्रयत्न केला जात होता.

यावेळी जहाजातून विषारी गॅस निघाल्यामुळे चौघा चोरट्यांचा जागेवरच गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समुद्रात संधीचा फायदा घेऊन या चोरट्यांकडून जहाजामधून चोरी सुरू होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे जहाज चार महिन्यांपूर्वी मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकले होते.

जहाजाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल असून तो परदेशात फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

या जहाजाचा वापर तेलाशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात असल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, जहाजावर चोरी करण्यासाठी काही चोरट्यांनी यापूर्वी दोन वेळा प्रवेश केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

पहिल्यांदा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल

दुसऱ्यांदा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा दावा

तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आठ जणांची टोळी स्पीडबोटच्या मदतीने जहाजावर गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

यातील एक जण बोटीवर थांबला, तर सात जण जहाजाच्या आत गेले होते. त्यापैकी चार जण जहाजाच्या आतील भागात पाईप कटिंग करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, याचवेळी जहाजाच्या आतील भागात गॅस गळती झाल्याचा संशय आहे. गॅस गळतीमुळे चारही जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच आज गोराई पोलिस आणि स्थानिक भाजप नगरसेवक शिवानंद शेट्टी जहाजावर जाऊन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चारही पार्थिव बाहेर काढले आहेत.

सध्या गोराई पोलिसांनी सर्व जप्त केलेल्या पार्थिव जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

चोरट्यांची ओळख पटवायचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

त्यासोबत हे समुद्रात कसे पोहोचून चोरी करत होते, या अँगलने सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

| मुद्दा | तपशील |

| घटना | जहाजात चोरी करताना चौघांचा मृत्यू |

| स्थळ | मनोरी बीच, गोराई, बोरिवली पश्चिम |

| जहाज | विदेशी; ४ महिन्यांपूर्वी अडकले |

| कारण | विषारी गॅस गळती; गुदमरून मृत्यू |

| टोळी | ८ जण; ७ जहाजात, १ बोटीवर |

| पूर्वीची चोरी | २ वेळा; २.५ लाख + ५ लाख |

| पार्थिव | हेलिकॉप्टरने बाहेर |

| तपास | गोराई पोलीस |

| मालक | परदेशात फरार; गुन्हा दाखल |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...