क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आल्यानंतर झालेल्या या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये १०-१२वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
"दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची फीस घेऊन ती नंतर परत देण्यापेक्षा ती घेऊच नका," अशी भूमिका घेण्यात आली आहे.
"दुष्काळासंदर्भात आज अनेक जिल्ह्यांतील आढावा घेण्यात आला. यावेळी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे."
"पहिल्या दोन महिन्यांत पाऊस झाला, त्यानंतरच्या दोन महिन्यांत पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण तांत्रिक बाबींमुळे शेतकऱ्याला फायदा घेता येणार नाही, असं नको व्हायला."
"त्यामुळे समाविष्ट न झालेल्या तालुक्यांनाही निकषांमध्ये आणून, जे जे शेतकरी दुष्काळबाधित आहेत, त्या सर्वांना दिलासा देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये न आलेल्या तालुक्यांनाही न्याय मिळेल."
"अनेक तालुके पीक करपले तरी ट्रिगर-१ मध्ये बसलेले नाहीत. तालुक्यांमध्ये ग्राउंड पाहणी करून दुष्काळाचे फायदे द्यायचे, आज ठरलेले आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्याही परिस्थितीला लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून फी घेऊन नंतर ती रिफंड देण्यापेक्षा ती घेण्यातच येऊ नये, असाही निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांबद्दल हा महत्त्वाचा आदेश काढण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
"या संदर्भात समिती तयार केली आहे. त्यावर समिती तयार केली आहे. जातीजातीत तेढ निर्माण होणार नाही. आरक्षण सर्वांना लाभ कसा होईल, समिती ठरवणार आहे."
"लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करणाऱ्यांवर मी काही टीका करणार नाही."
"जे काही अग्निवीरांची पहिली बॅच, त्यांचा कार्यकाळ संपवून येणार आहे. २५ अग्निवीर आर्मीत कायम राहतील. पोलिस किंवा इतर ठिकाणी त्यांना आरक्षण असेल."
"अग्निवीरांना सेवेत सामावून घेणार आहे. निवृत्त अग्निवीरांना पोलिसी सेवेत समाविष्ट करून घेणार," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
| मुद्दा | तपशील |
| विद्यार्थी | १०-१२वीचे परीक्षा शुल्क घ्यायचे नाही |
| दुष्काळ | सर्व तालुक्यांचा यादीत समावेश |
| कारण | पहिल्या २ महिन्यांत पाऊस, नंतर गायब |
| ग्राउंड पाहणी | दुष्काळाचे फायदे देण्यासाठी |
| आरक्षण | समिती; जातीय तेढ नको |
| आंदोलन | अधिकार; टीका नाही |
| अग्निवीर | २५ आर्मीत; पोलिसी सेवेत समावेश |
| मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.