क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. दुष्काळाचे कारण पुढे करत यंदा 'तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा' असा सर्व मामला दिसत आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक वेगळेच राजकीय वळण आले आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक सामोपचाराने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वीच संगमनेर येथे आयोजित बैठकीत दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर यंदा राजकीय नेत्यांचा भर असल्याचे समोर आले आहे. दुष्काळाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणी या निवडणुकीसाठी एकमत घडवून आणत असल्याचे चित्र आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही राबवण्यात आली होती. यापूर्वीही हा प्रयोग झाला होता.
हीच परंपरा यंदाही पुढे घेऊन जाण्याचा राजकीय नेतेमंडळींचा मानस आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात व्यापक हितासाठी हे मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे.
बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. रविवारी झालेल्या या बैठकीला राम शिंदेंची अनुपस्थिती दिसून आली.
सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात एकत्र आल्याची चर्चा रंगली.
या बैठकीला माजी मंत्री शंकरराव गडाख, डॉ. सुधीर तांबे, आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर येथे आयोजित बैठकीवरून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना चांगलाच चिमटा काढला.
"सुजय विखे या बैठकीला होते, मात्र पालकमंत्र्यांना त्याची माहिती नव्हती."
"सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात प्रथमदर्शनी मतभेद असल्याचे दिसतं," असा टोला राम शिंदे यांनी लगावला.
"संगमनेर बैठकीबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी समोर येऊन बोलावं," असे राम शिंदे म्हणाले.
| मुद्दा | तपशील |
| निवडणूक | अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक |
| बैठक | संगमनेर, सर्वपक्षीय |
| एकत्र | सुजय विखे, बाळासाहेब थोरात |
| उद्देश | निवडणूक बिनविरोध |
| राम शिंदे | उमेदवारी अर्ज खरेदी; बैठकीला अनुपस्थित |
| चिमटा | पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना |
| मतभेद | सुजय विखे-राधाकृष्ण विखे |
| सहभागी | गडाख, तांबे, काळे, ७ आमदार |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.