क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
पालघर - पालघरमधून एक अतिशय खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चायनीज खाद्य पदार्थामध्ये मादक पदार्थ टाकून अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.
पालघरच्या चिंचणी येथील घटना असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चायनीजमध्ये मादक पदार्थ टाकून दोन अल्पवयीन आरोपींनी पीडित मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तर पीडित मुलगी आणि आरोपी एकाच महाविद्यालयातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), १२३, ७४, ७५, ३(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पीडित मुलीचे वडील वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने पीडित मुलगीवर अत्याचार होण्यापासून बचावली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरातून रोष व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, पीडित तरुणीला पाजण्यासाठी मादक मद्य खरेदी करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती आहे.
चिंचणीमधील वाणगाव नाक्यावरील मोरया बार अँड रेस्टॉरंटमधून आरोपीने मद्य खरेदी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
अल्पवयीन आरोपींना मद्य विक्री केल्या प्रकरणात बार चालकावर देखील कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. पालघर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पालघरच्या बोईसर येथील ओसवाल एम्पायर परिसरातील शिवम अपार्टमेंटमधील एका दुकानासमोर ४० वर्षीय विजय बेंद्रे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
साईलीला हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. मृत विजय बेंद्रे हे वेठबिगार म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
| मुद्दा | तपशील |
| घटना | चायनीजमध्ये मादक पदार्थ; अल्पवयीन मुलीचा विनयभंग |
| स्थळ | चिंचणी, पालघर |
| आरोपी | दोन अल्पवयीन |
| गुन्हा | वाणगाव पोलीस ठाणे; BNS + POCSO |
| बचाव | वडिलांनी वेळेत धाव घेतली |
| CCTV | अल्पवयीन आरोपींना मद्य विक्री कैद |
| दुसरी घटना | बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या |
| तपास | सुरू |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.