क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या (Gokul) निवडणुकीला वेग आला आहे. राजकीय नेत्यांनी हालचालींना सुरुवात केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सतेज पाटील विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार आहे. अशातच मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
"आम्ही महायुतीचे सगळे पक्ष एकत्र आहोत, ही निवडणूक बिनविरोध होणार नाही," असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
महायुतीमध्ये कधीही शंका नव्हती. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी या नावाने ही निवडणूक लढवणार आहे," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
"उद्या सकाळी सगळे पक्ष करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला जाऊन प्रचाराचा नारळ फुटणार आहे," अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
"आजची बैठक ही कोणाला किती जागा यासाठी प्राथमिक बैठक झाली आहे. आता आमच्यात मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणीही नाही. आम्ही सगळे महायुतीचे पक्ष एकत्र आहोत. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. ८ ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होईल," असे पाटील म्हणाले.
"आम्ही सगळे भाऊ एकत्र आहेत. मात्र एखाद्या जत्रेमध्ये जर एखादा भाऊ हरवला असेल, तर त्या भावाने देखील त्याची इच्छा बोलून दाखवली पाहिजे," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अदृश्य शक्तीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, "रात गई.. बात गई. ज्या वेळी आम्ही सगळे येऊन प्रचार करू, तशी आमच्यातील निगेटिव्ह संपेल," असेही ते म्हणाले.
"सगळे निर्णय कोल्हापुरात घेतले जातील. आमच्यावर कोणी कंट्रोल ठेवते असे नसते," असेही पाटील म्हणाले.
| टप्पा | तारीख |
| उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती | १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ |
| अर्जांची छाननी | २३ सप्टेंबर २०२६ |
| वैध अर्जांची यादी | २४ सप्टेंबर २०२६ |
| अर्ज माघारीची मुदत | २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ |
| अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप | ८ ऑक्टोबर २०२६ |
| मतदान | १८ ऑक्टोबर २०२६ |
| मतमोजणी व निकाल | १९ ऑक्टोबर २०२६ |
गेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी जिल्ह्यातील सर्व विरोधकांना एकत्र आणून महादेवराव महाडिक यांची अनेक वर्षांची एकछत्री सत्ता उलथवून लावली होती.
मात्र, गेल्या ५ वर्षांत राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळमधील राजकीय समीकरणेही पूर्णपणे बदलली आहेत.
| मुद्दा | तपशील |
| निवडणूक | गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) |
| लढत | सतेज पाटील विरुद्ध महायुती |
| आघाडीचे नाव | राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी |
| प्रचार सुरुवात | अंबाबाई दर्शनाने |
| चित्र स्पष्ट | ८ ऑक्टोबर |
| मतदान | १८ ऑक्टोबर |
| निकाल | १९ ऑक्टोबर |
| वक्तव्य | चंद्रकांत पाटील |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.