⚡ ब्रेकिंग News

"ना पाऊस, ना पाणी! दुष्काळी परिस्थितीमुळं लग्न जमेना"; तरुण शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडली व्यथा


 बार्शी तालुक्यातील धानोरे येथे लग्नाळू तरुणाची खंत; 'पाणीटंचाईमुळे गावांची प्रतिमा खराब, मुलींकडून नकार'; '१९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ'; 'दोन दिवसांत दुष्काळ जाहीर'; 'सरसकट नुकसानभरपाई'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

सोलापूर - पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अद्यापही राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली आहेत. अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका तरुणाने "पाऊस नाही, पाणी नाही, त्यामुळे लग्न होत नाही" अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बार्शी तालुक्यातील धानोरे येथे एका लग्नाळू तरुणाने भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या.

परिसरात पाऊस आणि पाण्याची तीव्र टंचाई असल्याने शेतकरी कुटुंबांतील मुलांची लग्ने जुळत नसल्याची खंत त्याने मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली.

यावेळी संबंधित तरुणाने दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अडचणीत सापडली असून, त्याचा परिणाम थेट विवाह जुळण्यावर होत असल्याचे सांगितले. "पाणीटंचाईमुळे गावांची प्रतिमा खराब होत असल्याने मुलींकडूनही नकार मिळत आहे," असे त्याने नमूद केले.

तरुणाच्या या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

"आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल," अशी माहिती संबंधित युवकाने दिली आहे.

"१९७२ नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ आहे," असे सांगत, येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी दिलासादायक घोषणा केली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणाऱ्या कामांना गती दिली जाईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

"शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची आणि अन्नधान्याची सोय करण्यात येणार आहे. कायदा म्हणून पंचनामा करतोय. पण मदत सरसकट करू... संकटात तुम्हीच एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

| मुद्दा | तपशील |

| दौरा** | सोलापूर जिल्हा, बार्शी तालुका, धानोरे |

| तरुणाची व्यथा | 'ना पाऊस, ना पाणी, लग्न जमत नाही' |

| कारण | पाणीटंचाईमुळे गावांची प्रतिमा खराब |

| आश्वासन | पाणीप्रश्न सोडवणार |

| दुष्काळ | १९७२ नंतरचा सर्वात मोठा |

| घोषणा | दोन दिवसांत दुष्काळ जाहीर |

| मदत | सरसकट नुकसानभरपाई |

| उपाय | जलसंधारण, रोजगार निर्मिती |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...