⚡ ब्रेकिंग News

एका बाजूला दुष्काळ! दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; मुंबईत विमानसेवा विस्कळीत


 जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड पाण्याखाली; अंधेरी सबवे २-३ फूट पाण्यात; वाहतुकीसाठी बंद; फिल्म सिटीत झाडे कोसळली; विमानांना विलंब; काही विमाने वळवली

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

मुंबई - राज्यात एका बाजूला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत.

असं असतानाच सध्या दुसरीकडे मुंबईत मात्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड पाण्याखाली गेला आहे.

वीरा देसाई रोडवर दीड ते दोन फूट पाणी भरले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तर या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. मुंबईतील हवाई सेवा अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विस्कळीत झाली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे.

अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे मागील एक तासापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अंधेरी पश्चिम एस. व्ही. रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

तर सबवेमध्ये भरलेले पाणी काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून जनरेटरच्या माध्यमातून पाणी काढले जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे.

अंधेरी सबवेमध्ये भरलेल्या पाण्यात ओमीनी कार आणि पोलिसांच्या बॅरिकेट वाहून गेल्या आहेत.

गेल्या एक तासभरापासून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिल्म सिटीमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला विमानसेवा विस्कळीत झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला रोडवरील वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

| मुद्दा | तपशील |

| हवामान | वादळी वारा + मुसळधार पाऊस |

| परिणाम* | जोगेश्वरी पश्चिम वीरा देसाई रोड पाण्याखाली |

| अंधेरी सबवे | २-३ फूट पाणी; वाहतुकीसाठी बंद |

| वाहतूक | एस. व्ही. रोडवर मोठी कोंडी |

| विमानसेवा | विलंब; काही विमाने वळवली |

| झाडे | फिल्म सिटीत अनेक ठिकाणी कोसळली |

| जीवितहानी | नाही |

| मनपा | जनरेटरने पाणी काढत आहे |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...