⚡ ब्रेकिंग News

'हमका हिंदी आता नहीं...' पत्रकारांनी हिंदीतून बोलण्याची गळ घातली अन् राज ठाकरेंचं मिश्कील उत्तर; 'हमारे सांसद हैं...' म्हणत राऊतांकडे बोट


 ४ ऑक्टोबरला भायखळा ते सीएसएमटी महामोर्चा; निवडणूक आयोगाविरोधात मनसे-शिवसेना (UBT) एकत्र; 'हा मोर्चा कोणत्याही पक्षाविरोधात नाही'; 'कुठल्याही पक्षाचे झेंडे नसतील'; सर्वपक्षीयांना फोनवरून आमंत्रण

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई - राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत ४ ऑक्टोबरला महामोर्चाची हाक दिली आहे. याच मोर्चासंदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क इथे शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेऊन ४ ऑक्टोबरला होणाऱ्या मोर्चाची रुपरेषा मांडली.

४ ऑक्टोबरला भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रूडास कंपनीजवळून मोर्चा निघेल. जे. जे. उड्डाणपुलावरून मोर्चा मार्गस्थ होईल आणि मुंबई महापालिकेजवळ मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

सकाळी साडेअकरा वाजता मोर्चा सुरू होणार असून "हा मोर्चा कुठल्याही पक्षाविरोधात नाही," असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीयांना या आंदोलनात आमंत्रित केलं आहे.

"फोन करून सर्वपक्षीयांना आंदोलनाचं आमंत्रण दिलं जाणार आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं. "निवडणूक आयोगाविरोधातला अजेंडा घेऊनच रस्त्यावर उतरत आहोत," असं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंनी यावेळी सांगताना ४ ऑक्टोबरला भायखळा ते सीएसएमटी मोर्चा निघेल, असं सांगितलं. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता मोर्चा निघणार असून मोर्चानंतर पुढची रुपरेषा ठरवू, असंही म्हटलं आहे.

"मोर्चा राजकीय पक्षाविरोधात नाही, तर निवडणूक आयोगाविरोधात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना फोन केले जातील, पत्र नाही. कुठल्याही राजकीय पक्षांचे झेंडे मोर्चात नसतील," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपला टोलाही लगावला आहे.

पत्रकार परिषदेनंतर मात्र, राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर काहीसं हलकं-फुलकं वातावरण पाहायला मिळालं.

राज ठाकरेंनी पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर निघत असतानाच एका हिंदी माध्यमांच्या प्रतिनिधीनं त्यांना विनंती करत, हिंदीतून प्रतिक्रिया देण्यासाठी विचारलं.

त्यावेळी राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत उत्तर दिलं आणि एकच हशा पिकला.

हिंदी माध्यमांच्या प्रतिनिधींनी हिंदीत बाईट मागताच, "हमका हिंदी आता नहीं...", असं म्हणत मिश्कील उत्तर दिलं.

त्यानंतर "हमारे सांसद हैं... हिंदी प्रतिक्रियेसाठी...", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांकडे बोट दाखवलं.

तर, आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांकडे इशारा करत, "कोणाचा कुणाशी संपर्क हे तुम्ही सांगा...", असं म्हटलं.

| मुद्दा | तपशील |

| मोर्चा | ४ ऑक्टोबर, निवडणूक आयोगाविरोधात |

| आयोजक | मनसे + शिवसेना (UBT) |

| मार्ग | भायखळा (रिचर्डसन अँड क्रूडास) ते सीएसएमटी |

| वेळ | सकाळी साडेअकरा |

| संदेश | 'कोणत्याही पक्षाविरोधात नाही' |

| झेंडे | कुठल्याही पक्षाचे नसतील |

| आमंत्रण | सर्वपक्षीयांना फोनवरून |

| राज ठाकरेंचं उत्तर | 'हमका हिंदी आता नहीं...' |

| उद्धव ठाकरेंचा इशारा | 'हमारे सांसद हैं...' (संजय राऊत) |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...