⚡ ब्रेकिंग News

मोहरमदरम्यान 'पेन किलर' म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या; एकाची प्रकृती गंभीर, १४ हजार गोळ्या जप्त


भायखळ्यात धक्कादायक प्रकार; ऑनलाईन ३० हजार कॅप्सूल आणि १०० किलो विषारी पावडर ऑर्डर; 'लोन वुल्फ अटॅक'च्या अँगलने तपास

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना 'पेन किलर' (वेदना शामक) गोळ्या असल्याचे सांगून चक्क उंदीर मारण्याचे औषध (गोळ्या) वाटण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही तरुणांची प्रकृती बिघडली असून, एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोळ्यांचे वाटप करणाऱ्या मुख्य आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १४ हजार विषारी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 ३० हजार कॅप्सूल आणि १०० किलो विषारी पावडरची ऑनलाईन ऑर्डर!

या घटनेची माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP) जयंत मीना यांनी सांगितले, "आरोपीने ठराविक लोकांना टार्गेट करण्यासाठी आणि त्यांना जीवे मारण्याच्या किंवा मोठी हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने ऑनलाईन पद्धतीने तब्बल ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि १०० किलो झिंक फॉस्फाईड (उंदीर मारण्याचे अत्यंत विषारी रसायन) ऑर्डर केले होते."

"त्याने प्रत्येक कॅप्सूलमध्ये एक-एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरून या विषारी गोळ्या तयार केल्या होत्या. मिरवणुकीतील लोकांना फसवून, ही गोळी 'पेन किलर' म्हणून काम करते असे सांगत तो या गोळ्यांचे वाटप करत होता," असेही त्यांनी स्पष्ट केले.

 उलट्या आणि पोटदुखी सुरू झाल्यानंतर संशय बळावला

मिरवणुकीतील काही लोकांनी ही गोळी खाल्ल्यानंतर त्यांना तीव्र पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्या. बाधित व्यक्तींनी रात्रीच पोलिसांत तक्रार केली. गोळ्या वाटणाऱ्या व्यक्तीवर संशय आल्यानंतर भायखळा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली.

आरोपीचा मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या (Technical Investigation) आधारे पोलिसांनी त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या झडतीत त्याच्याकडे सुमारे १४ हजार तयार गोळ्या आणि जवळपास ५० किलो उंदीर मारण्याचे विषारी औषध सापडले आहे.

'लोन वुल्फ अटॅक'च्या अँगलने तपास सुरू

मुंबई पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. जर या १४ हजार गोळ्या लोकांमध्ये वाटल्या गेल्या असत्या आणि अनेकांनी त्याचे सेवन केले असते, तर शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आला असता.

या व्यक्तीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषारी गोळ्या का तयार केल्या? यामागे त्याचा नेमका हेतू काय होता? या सर्व बाजूंचा पोलीस कसून तपास करत आहेत. प्राथमिक तपासात या घटनेमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या 'लोन वुल्फ अटॅक' (ज्यामध्ये एकच व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करून मोठा हल्ला करते) सारखा प्रकार तर नाही ना, या दृष्टीनेही तपास केला जात आहे. या प्रकरणात कोणतीही दहशतवादी लिंक आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व यंत्रणांच्या मदतीने तपास करत आहेत.

आरोपी कोण?

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३९ वर्षीय आरोपीचे नाव फैयाज प्रेमजी असून, तो मूळचा पुणे येथील विमाननगर परिसराचा रहिवासी आहे. पोलिसांना तपासात आरोपीच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल १४,९०० तयार कॅप्सुल आणि नागरिकांना मोठी हानी पोहोचवण्याच्या हेतूने ऑनलाईन मागवलेले ५० किलो झिंक फॉस्फाईड सापडले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी यापूर्वी २०२५ मध्ये इराण आणि इराक या देशांचा दौरा करून आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागे नक्की काय हेतू होता आणि याचे काही आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी कनेक्शन आहे का, या दिशेने मुंबई पोलिसांकडून पुढील अधिक तपास अत्यंत गांभीर्याने सुरू आहे

 पोलिसांची त्वरित कारवाई

मिरवणुकीदरम्यान एक संशयित व्यक्ती नागरिकांना काही कॅप्सुल (गोळ्या) वाटप करत असल्याचे आग्रीपाडा पोलीस स्टेशन चे डीसीपी जयंत मीना आणि त्यांच्या पथकाच्या सतर्कतेमुळे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला पकडून विचारणा केली असता, त्याने या 'पेन किलर' गोळ्या असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कॅप्सुल आणि मोबाईल जप्त केला.

मोहरमदरम्यान 'पेन किलर' सांगून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करून १४ हजार विषारी गोळ्या जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला. आरोपी फैयाज प्रेमजीने ऑनलाईन ३० हजार कॅप्सूल आणि १०० किलो विषारी पावडर मागवल्याचे उघड झाले आहे. त्याचा भूतकाळात इराण-इराक दौरा आणि 'लोन वुल्फ अटॅक'चा संभाव्य धागा पोलिसांच्या तपासाला कलाटणी देऊ शकतो. सद्यस्थितीत आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने सुरू आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...