संघर्षातून UPSC परीक्षेत ५८४ वा क्रमांक मिळवत मारली बाजी; फुलांची उधळण आणि साखरेचे वाटप करत तालुक्याने साजरा केला विजयोत्सव.
आटपाडी क्रांती न्युज :
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर आटपाडीच्या मातीने पुन्हा एकदा यशाला गवसणी घातली आहे. UPSC परीक्षेत देशात ५८४ वा क्रमांक पटकावून आयपीएस (IPS) पदाला गवसणी घालणाऱ्या प्रवीण कोळपे यांचे आज आटपाडीमध्ये ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.
आमदार गोपीचंद पडळकरांची उपस्थिती
या विशेष सोहळ्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः उपस्थित राहून प्रवीण कोळपे यांचे अभिनंदन केले. "एका सामान्य घरातील मुलाने आपल्या कष्टाने मिळवलेले हे यश आटपाडीसाठी अभिमानास्पद आहे," अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
जनतेचा उदंड प्रतिसाद आणि साखर वाटप
मिरवणुकीदरम्यान आटपाडीकरांनी मोठ्या संख्येने ररस्त्यावर गर्दी केली होती. जागोजागी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली, तर आनंदाचे प्रतीक म्हणून नागरिकांना आमदार गोपीचंद पडळकर आणि आटपाडीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष यु टी जाधव सर यांनी साखर वाटून तोंड गोड करण्यात आले. प्रवीण कोळपे यांच्या या यशामुळे आटपाडी तालुक्याचे नाव राज्याच्या नकाशावर पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
प्रवीण कोळपे यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळवलेले हे यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे. "शून्य ते जागतिक दर्जाचा प्रवास कसा असू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण कोळपे," असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.