⚡ ब्रेकिंग News

शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन् मिरारोड हादरलं

 

"तुझ्या आईला जीवे मारीन" अशी धमकी दिल्यानंतरही खून; टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला विशाखापट्टणमहून अटक

मिरारोड (ठाणे): मनोरंजन क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथे एका टीव्ही अभिनेत्याने आपल्याच घरी काम करणाऱ्या मोलकरणीची क्रूर हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. 

आरोपी आशिष मेश्राम हा टीव्ही अभिनेता असून, काही प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी त्याला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून अटक केली.

नेमके प्रकरण काय?

काशिमिरा भागातील रहिवासी असलेली ही महिला गेल्या तीन वर्षांपासून सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत आशिष मेश्राम यांच्या घरी घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असताना महिलेवर चाकूने सपासप वार करण्यात आले. तिच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर गंभीर जखमा होत्या. शेजाऱ्यांना दारातच गंभीर जखमी अवस्थेत ती दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तिचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेच्या वेळी आरोपी अभिनेता सोसायटीतून अत्यंत घाईघाईने बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि विशाखापट्टणम येथून त्याला अटक केली.

खुनामागील कारण

प्राथमिक तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आशिष मेश्राम गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत होता. महिलेनं ही मागणी वारंवार नाकारल्याने आरोपीने तिचा छळ सुरू केला होता. जानेवारी महिन्यात आशिषने महिलेच्या मुलाला फोन करून धमकी दिली होती की, “तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर तिला जीवे मारीन.”

महिलेच्या मुलाने आशिषला मारण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, आशिषच्या मोठ्या भावाने महिलेला “आशिष आता फ्लॅटवर राहत नाही” असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर महिला पुन्हा कामावर जाऊ लागली. कामावर आल्याचे पाहून आरोपीने घरात प्रवेश केला आणि तिचा खून केला.

मृत महिलेच्या पश्चात पती आणि चार मुले असा परिवार आहे. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो, तर मोठा मुलगा खाजगी कंपनीत नोकरी करतो. महिला आठ-नऊ घरांमध्ये काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करत होती.

या घटनेने मिरारोड परिसरासह मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...