मुंबई/दिल्ली: महाराष्ट्रासह देशभरात गॅस टंचाई गंभीर होत असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे आणि चिंताजनक वक्तव्य केले आहे. तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
शनिवारी दिल्लीत केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले,
"केंद्र सरकारच्या एका पत्रकात तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा उल्लेख आहे. त्यामुळे आता पीएनजी (पाईप गॅस) च्या जोडण्या जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत."
भुजबळ यांनी दिलेल्या सूचना
पीएनजी गॅस सध्या स्वस्त पडत असल्याने त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा.
सर्व नगरपालिकांनी पीएनजी जोडण्या वाढवाव्यात.
पाणी आणि वीजेच्या कनेक्शनप्रमाणे इमारतींना पीएनजी कनेक्शन घेणे सक्तीचे करण्यात यावे.
पीएनजी पाईपलाइनसाठी विविध विभागांकडून परवानग्या २४ तासांत देण्यात याव्यात.
केरोसिनचा पर्याय
गॅस टंचाईमुळे केरोसिनचा वापर वाढवण्याचीही तयारी दर्शवत भुजबळ म्हणाले,
"राज्यात साडेतीन हजार लिटर केरोसीन उपलब्ध आहे. जिथे एलपीजी आणि पीएनजी कमी आहेत तिथे केरोसीन देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जुने डिलर्स ज्यांचे रिन्युअल प्रलंबित आहे, त्यांनी तात्काळ कामाला लागावे. पेट्रोल पंपांवर केरोसिन टँकर ठेवून उपलब्धता सुनिश्चित करण्यात येईल."
ही बैठक निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅस पुरवठा कसा सुलभ करता येईल यावर केंद्रित होती. बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, हरदीप पुरी आणि प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
सध्या आखाती देशांतील युद्धामुळे देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली असून, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक गॅस सिलिंडरसाठी रांगा लावताना दिसत आहेत. भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील गृहिणी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.