⚡ ब्रेकिंग News

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं; तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश


अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादानंतर मोठी कारवाई; अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सोपवण्यात आली जबाबदारी

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत झाला होता मोठा राडा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी यांना निलंबन करण्याची मागणी करण्यात आली होती.

राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती नाराजी

एकनाथ शिंदे म्हणाले होते, “सातारा जिल्ह्यातील घटनेसंदर्भात माहिती शंभुराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी मांडली. मी पोलीस अधीक्षकांना फोन केला की, मतदानानंतर कारवाई करा, मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. मी पोलिस महासंचालकांनाही फोन केला. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून करणे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली.”

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याची चौकशी केली जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल.”

कोण आहेत तुषार दोशी?

तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे आणि राजकीय संघर्षामुळे ते चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांच्यावर विधानपरिषदेत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, नंतर हे निलंबन रद्द करण्यात आले होते.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं?

 जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीने ६५ पैकी ३५ जागा मिळवत बहुमत प्राप्त केले होते.

भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

 अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ६ सदस्य फोडत अध्यक्षपदावर विजय मिळवला.

 भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ सदस्य तर एका अपक्षाचा पाठिंबा मिळवला.

 इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेकडून आरोप करण्यात आला होता.

सातारा जिल्हा परिषद प्रकरणी आता पोलीस अधीक्षकांच्या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील चौकशी अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...