⚡ ब्रेकिंग News

रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर; चौधरींसोबत बांधकाम व्यवसाय, कोर्टातही दाखल याचिका

 

अशोक खरात प्रकरणात आज चौकशीची शक्यता; ‘शिवनिका’ संस्थेच्या व्यवहारांचा एसआयटीकडून तपास, गुलाबो गँगकडूनही आंदोलन

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष्य बनवले जात असताना आता रुपाली चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर आले आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. या दाव्याला आता पुष्टी मिळाली आहे.

रोह्यात चाकणकर-चौधरींचा बांधकाम व्यवसाय

मिळालेल्या माहितीनुसार, तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगडमधील रोह्यात निलेश चाकणकर (रुपाली चाकणकर यांचे पती) आणि आकाश चौधरी यांनी बांधकाम व्यवसायात एकत्र पार्टनरशिप केली आहे. या दोघांनी ‘कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी’च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे.

आकाश चौधरी यांचे अनेक व्यवसाय

आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टिंग, कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो अँड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, एफएल३ हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट आणि कर्मा कन्स्ट्रक्शन असे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत. यामुळे चाकणकर आणि चौधरी यांच्यातील व्यावसायिक संबंध अधोरेखित झाले आहेत.

कोर्टातही याचिका दाखल

रुपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपच्या अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनधिकृतपणे आणि चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचा या याचिकेत आरोप करण्यात आला आहे.

अशोक खरात प्रकरणी आज चौकशीची शक्यता

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आज (३० मार्च) चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार तपासाच्या रडारवर ठेवले आहेत. या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह ‘शिवनिका’ संस्थेच्या आजी-माजी ट्रस्टींनाही समन्स बजावण्यात आले आहेत.

गुलाबो गँगकडून आंदोलन

रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आज (३० मार्च) सकाळी ११ वाजता पुण्यात गुलाबो गँगकडून आंदोलन करण्यात येणार आहे. अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या समर्थनार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.

अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणाचा तपास वाढत असून, चाकणकर यांच्यासाठी पुढील काळातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...