⚡ ब्रेकिंग News

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्तांतर; साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्तांतर; साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव

योगेश सोमण अध्यक्षपदी, स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह; १० वर्षांनी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी दिला कौल

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये साहित्य संवर्धन पॅनेलने बाजी मारली आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत परिषदेच्या कारभारावर नव्या कार्यकारिणीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखालील साहित्य संवर्धन पॅनेलने परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव केला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगेश सोमण यांनी मिलिंद जोशी यांचा पराभव केला. तर प्रमुख कार्यवाह पदावर स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष पदावर प्रदीप निफाडकर हे साहित्य संवर्धन पॅनेलचे उमेदवार निवडून आले. परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या मुख्य कार्यवाह पदाच्या उमेदवार सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला.

स्थानिक कार्यवाह पदांचे विजयी उमेदवार:

सुनील महाजन (साहित्य संवर्धन)

अंजली कुलकर्णी (परिवर्तन उत्कर्ष)

सुनेत्रा मंकणी (साहित्य संवर्धन)

प्रसाद मिरासदार (साहित्य संवर्धन)

माधव राजगुरू (परिवर्तन उत्कर्ष)

नितीन संगमनेरकर (साहित्य संवर्धन)

आशुतोष जावडेकर (परिवर्तन उत्कर्ष)

ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व

महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही निवडणूक २०१६ नंतर प्रथमच पार पडली. २०२१ मध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली होती. परिणामी, १० वर्षांनी ही निवडणूक पार पडली. पुढील वर्षी पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीतील सत्तांतर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

या निवडणुकीदरम्यान विविध आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळाले. मात्र, अखेर मतदारांनी साहित्य संवर्धन आघाडीला कौल दिला असून, परिषदेच्या कारभारावर नव्या पॅनेलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...