⚡ ब्रेकिंग News

अवकाळीचे सावट! गुढीपाडव्याला राज्यात पावसाची एन्ट्री; विदर्भात गारपीटीचा रेड अलर्ट, वाचा १३ जिल्ह्यांचा ताजा अपडेट


 अवकाळीचे सावट! गुढीपाडव्याला राज्यात पावसाची एन्ट्री; विदर्भात गारपीटीचा रेड अलर्ट, वाचा १३ जिल्ह्यांचा ताजा अपडेट

उन्हाळ्यात हिवाटीचा मूड; कोकण वगळता राज्यात वादळी पावसाचा इशारा, विदर्भात पारा ४० अंशांवर

पुणे : राज्यात सध्या उन्हाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला असतानाच हवामानाने अचानक करवट बदलली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी लागणार असून, विदर्भातील किमान सहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यांत कधी पाऊस?

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

गारपिटीचा सर्वाधिक धोका: बुधवारी (१८ मार्च) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे.

पावसाचा यलो अलर्ट: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे.

कोकणातही सरी: १८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

उन्हाचा तापमानाचा पारा कायम

एकीकडे पावसाची शक्यता असताना, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेची तीव्रता कायम राहील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या उत्तर कोकण पट्ट्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या भागात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

सोमवारी विदर्भातील वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात मात्र रात्रीचा पारा १६.४ अंशांपर्यंत खाली आल्याने किमान तुरळक थंडावा जाणवला.

शेतकरी आणि नागरिकांना सूचना

एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे (हरभरा, ज्वारी, गहू) आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेले पीक त्वरित सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...