⚡ ब्रेकिंग News

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं...' पोस्ट तुफान व्हायरल

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं...' पोस्ट तुफान व्हायरल

'इटरनल सनशाइन'चा विस्तार करत आलियाचा नवा उपक्रम 'इटरनल किड्स'; लहान मुलांसाठी आणणार खास कथा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा आज (१५ मार्च) ३३ वा वाढदिवस. या खास दिवशी तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने तिची प्रॉडक्शन कंपनी 'इटरनल सनशाइन प्रॉडक्शन'अंतर्गत एक नवा उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे नाव 'इटरनल किड्स' असून, खास लहान मुलांसाठी शो आणि चित्रपट निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, "आमच्या प्रॉडक्शन हाऊस 'इटरनल सनशाईन'ल नुकतंच बाळ झालं आहे. 'इटरनल किड्स' सर्वांना हॅलो म्हणा! तीन प्रोजेक्ट्स घेऊन येत आहोत - सी, दी अँड एम. लवकरच याची नावे सांगू."

आजोबांच्या कथांपासून प्रेरणा

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना आलिया म्हणाली, "यामध्ये माझ्या आजोबांनी सांगितलेल्या कथांचा समावेश आहे. शाहीन आणि मी या कथा ऐकत वाढलो आहोत. आता या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे." आलियाच्या या पोस्टने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, चाहत्यांकडून तिचं कौतुक केलं जात आहे.

आलिया भट्ट ही केवळ अभिनेत्री नाही तर एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. तिने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलीला जन्म दिला. आता 'इटरनल किड्स'च्या माध्यमातून ती लहान मुलांसाठी खास कथा घेऊन येत असून, तिचा हा नवा उपक्रम चर्चेत आला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...