रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपातील मुख्य आरोपीला मोठा दिलासा
पुणे: कल्याणीनगरमधील चर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात आज (१० मार्च २०२६) मोठी घडामोड घडली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) जामीन मंजूर केला आहे. गेल्या २२ महिन्यांपासून येरवडा केंद्रीय कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अग्रवाल यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
अपघातावेळी पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील असलेले विशाल अग्रवाल हे ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. १९ मे २०२४ रोजी कल्याणीनगरमध्ये त्यांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण-तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंत�े अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप विशाल अग्रवाल यांच्यावर होता. पोलिसांनी त्यांना २१ मे २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती.
या प्रकरणात अल्पवयीन चालकाला मद्यप्राशनासाठी मदत करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अग्रवाल यांच्यावर आहे. जामीन मिळवण्यासाठी त्यांनी अनेक न्यायालयीन प्रयत्न केले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत जामीन मंजूर केला.
याआधी, त्याच प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी ठरलेल्या ससून रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अग्रवाल यांच्या जामीनामुळे पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध तसेच इतर संशयितांविरुद्धची कायदेशीर प्रक्रिया सुरूच आहे.
कोण आहेत विशाल अग्रवाल?
ते ब्रम्हा कॉर्प या प्रतिष्ठित बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख आहेत.
ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेला हा समूह गेली ४० वर्षे पुण्यातील बांधकाम क्षेत्रात अग्रेसर आहे.
वडगाव शेरी, खराडी, विमाननगर या भागातील अनेक मोठे गृहप्रकल्प, तसेच ली मेरिडियन हॉटेल आणि रेसिडेन्सी क्लबसारखे व्यावसायिक प्रकल्प या कंपनीने उभारले आहेत.
विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची एकूण मालमत्ता ६ कोटी १२ लाख रुपयांहून अधिक आहे.
आलिशान गाड्यांचे शौकीन असलेल्या विशाल अग्रवाल यांच्यामुळेच त्यांच्या अल्पवयीन मुलाला पोर्शे कार चालवायला मिळाली, ज्यातून हा भीषण अपघात झाला.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.