⚡ ब्रेकिंग News

कर्जमाफीचे निकष फडणवीसांनी एका वाक्यात स्पष्ट केले; कोणते शेतकरी पात्र ठरणार? थकबाकीदारांसाठी मोठी घोषणा

 

  कर्जमाफीचे निकष फडणवीसांनी एका वाक्यात स्पष्ट केले; कोणते शेतकरी पात्र ठरणार? थकबाकीदारांसाठी मोठी घोषणा

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योने'अंतर्गत दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज होणार माफ; ३० जूनपर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर करताना कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही त्यांनी स्पष्ट केले आहेत. विरोधकांकडून विविध आरोप होत असताना फडणवीस यांनी एका वाक्यात सर्व समज-गैरसमज दूर केले.

नेमके निकष काय?

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाईल. ते म्हणाले, "काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज माफ होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेचं होणार नाही, तर कोणी सोसायटीचं कर्ज माफ होणार नाही असं म्हणत आहेत. पण आम्ही स्पष्ट करतो की, दोन लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा सर्व संस्थांनी दिलेले पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत."

३० जूनपूर्वी कर्जमाफी पूर्ण करणार

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आमचा प्रयत्न आहे की ३० जूनच्या आधी कर्जमाफी करायची आहे. ही कर्जमाफी शेतकऱ्याला देणे आमचं उद्दिष्ट आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही काम करत आहोत. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा ही योजना अधिक चांगली असेल."

पात्र शेतकरी कोण?

- ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थकलेले आहे.

- ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले कर्ज असलेले शेतकरी.

- कोणत्याही बँकेचे (राष्ट्रीयकृत, जिल्हा बँक, सोसायटी) पीक कर्ज असलेले शेतकरी.

- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ.

विरोधकांची टीका

या घोषणेनंतर महाविकास आघाडीने ती अपुरी असल्याचा आरोप केला आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करतानाच अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवल्याचे फडणवीस यांच्या भाषणावरून स्पष्ट होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करताना. त्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचे निकष स्पष्ट केले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...