⚡ ब्रेकिंग News

अपघाताचा महामार्ग! काटोल-वरुड सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा, दहा दिवसात दोन दुचाकीस्वरांचा अंत, एका वर्षात ३० अपघातांची नोंद


भेगांमुळे दुचाकीस्वरांचे नियंत्रण सुटून जीवितहानी; नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी, बावनकुळे यांची गडकरींशी चर्चा करणार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल-वरुड या सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यामुळे हा रस्ता दुचाकीस्वारांसाठी अपघाताचे कारण ठरत आहे. मागील दहा दिवसांत याच रस्त्यावर झालेल्या दोन अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका वर्षात या रस्त्यावर ३० अपघातांची नोंद झाली असून, ११ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दहा दिवसांत दोन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी महेश धोटे हे दुचाकीवरून जात असताना चांदस (वाठोडा) येथे सिमेंट रस्त्याच्या भेगेत त्यांच्या दुचाकीचा चाक अडकून वाहन स्लिप झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना २७ मार्च रोजी घडली. प्रतीक पांडुरंग निकोसे (रा. जलालखेडा) यांची दुचाकी रस्त्यावरील भेगा व खड्ड्यांमुळे अस्थिर झाली आणि अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

एका वर्षात ३० अपघात, ११ जीवितहानी

स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील एका वर्षात या रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे ३० अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये ११ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. दोन वर्षांपूर्वीच सिमेंटीकरण झालेला हा रस्ता आता मोठ्या प्रमाणात भेगा व खड्डे पडल्याने अपघातांचे कारण ठरत आहे.

प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, नागरिकांत रोष

सिमेंटीकरण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती न केल्याने प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. महिन्याभरात दोन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. स्थानिकांनी तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. पोलिसांनी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.

बावनकुळे यांची गडकरींशी चर्चा करणार

या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “काटोल-वरुड रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. या रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न सोडवला जाईल.”

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली असून, पुन्हा कोणीही जीव गमावू नये, यासाठी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून पुढील कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...