⚡ ब्रेकिंग News

शरद पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदी बैठकीत भडकल्या; उद्धव ठाकरे म्हणाले – “पक्षप्रमुख मी आहे, निर्णय मीच घेईन”

 


शरद पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदी बैठकीत भडकल्या; उद्धव ठाकरे म्हणाले – “पक्षप्रमुख मी आहे, निर्णय मीच घेईन”

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची मुंबईत झालेल्या महत्वाच्या बैठकीत मोठी खडाखड उडाली. राज्यसभेच्या जागेवरून बोलताना प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच आक्रमक झाल्या.

बैठकीत उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी अचानक उठल्या आणि म्हणाल्या,  

संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं?”

यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेत उत्तर दिले,  

“ते बोलले म्हणून काय झालं? शेवटी पक्षप्रमुख मी आहे. निर्णय मीच घेईन.”

 बैठकीत काय घडलं?

उद्धव ठाकरे यांनी बैठक सुरू करताना खासदारांना विश्वास देऊन सांगितले,  

“मला भाजप-राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे.”

राज्यसभेच्या जागेसंदर्भात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी जागा मागितल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही राष्ट्रवादीशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार?”

याच वेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊत यांच्या शरद पवारांबाबतच्या विधानावर आक्षेप घेतला.

संजय राऊत यांचे उत्तर

बैठकीत खडाखडी झाल्याच्या वृत्तांना संजय राऊत यांनी फेटाळले. ते म्हणाले, “मी त्या बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही.”

 महाराष्ट्रातून राज्यसभा उमेदवारांची यादी

१. शरद पवार  

२. रामदास आठवले  

३. विनोद तावडे  

४. माया चिंतामण ईवनाते  

५. रामराव वडकुते  

६. ज्योती वाघमारे  

७. पार्थ पवार  


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...