मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकदा चर्चेत असतो. कधी टीकाही होतो, तर कधी त्याच्या दिलदार कृतींमुळे सर्वांचे मन जिंकतो. यावेळी त्याने एक हृदयस्पर्शी कृत्य करून पुन्हा एकदा सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियममध्ये काम करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंदाजे १०-११ ग्राऊंडस्टाफ सदस्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे चेक वाटले आहेत.
का दिले १० लाख रुपये?
ही कृती कोणत्याही सामान्य कारणासाठी नव्हती. हार्दिक २०२६ च्या टी-२० विश्वकपाच्या तयारीसाठी वानखेडे स्टेडियमवर रात्री उशिरापर्यंत सराव करत होता. यामुळे ग्राऊंडस्टाफ सदस्यांना जास्त वेळ थांबावे लागत होते. तरीही त्यांनी हार्दिकच्या सरावासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
त्या वेळी हार्दिकने त्यांना बक्षीस देण्याचे वचन दिले होते. आता आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रानंतर हार्दिकने आपले वचन पूर्ण केले. सरावादरम्यान मदत करणाऱ्या सर्व ग्राऊंडस्टाफ सदस्यांना त्याने प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश सादर केले.
या प्रसंगी सर्व ग्राऊंडस्टाफ सदस्यांनी हार्दिकसोबत फोटोही काढले, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक हार्दिक पांड्याच्या या कृतीचे खूप कौतुक करत आहेत.
हार्दिक पांड्या केवळ महागड्या घड्याळे आणि स्पोर्ट्स कारसाठीच ओळखला जात नाही, तर अशा दिलदार कृतींसाठीही त्याला आता अधिक मान मिळत आहे. टीकाकारांसमोर त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो केवळ छपरी नाही तर मन मोठे असलेला खेळाडूही आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.