⚡ ब्रेकिंग News

कोलंबियात हवाई दलाचे विमान कोसळले; ११० जवानांसह १२५ प्रवासी, उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर अपघात


कोलंबियात हवाई दलाचे विमान कोसळले; ११० जवानांसह १२५ प्रवासी, उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर अपघात

दक्षिण अमेझॉनमधील प्यूर्टो लेगुइजामो येथे C-130 हरक्यूलिस विमान कोसळले; संरक्षण मंत्र्यांकडून माहिती, स्पष्टीकरणाची प्रतिक्षा; फेब्रुवारीत बोलिव्हियातही झाली होती अशीच दुर्घटना

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात हवाई दलाचे एक मोठे वाहतूक विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. लॉकहीड मार्टिन हरक्यूलिस C-130 या विमानात सशस्त्र दलाचे ११० जवान प्रवास करत होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन किलोमीटरवरच ही दुर्घटना घडली.

ही घटना सोमवारी (२३ मार्च) कोलंबियाच्या दक्षिण भागातील पुतुमायो प्रांतात पेरू सीमेजवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो येथे घडली. स्थानिक वृत्तसंस्था ब्लू रेडिओनं दिलेल्या माहितीनुसार, विमानाने येथील विमानतळावरून उड्डाण केले आणि शहरापासून काही अंतरावरच ते कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळताच त्यातून आगीचे लोट उसळले आणि मोठा आवाज झाला.

कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेद्रो सांचेझ यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, विमानात सशस्त्र दलाचे जवान होते. मात्र, अद्याप मृतांची नेमकी संख्या आणि अपघाताचे कारण समोर आलेले नाही. बचावकार्य सुरू असून, पुढील तपासणीनंतरच अधिक माहिती देता येईल, असे ते म्हणाले. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बोलिव्हियातही हरक्यूलिस C-130 याच मॉडेलचे विमान राजधानी ला पाज जवळील ऑल्टो येथे कोसळले होते. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० जण जखमी झाले होते. त्या वेळी विमानातील पैसे शहरातील विविध भागात पडल्याने सुरक्षा दल आणि नागरिकांमध्ये संघर्षही झाला होता.

C-130 विमानाची वैशिष्ट्ये:

अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनद्वारे निर्मित या विमानाची लांबी ३० मीटर तर उंची १२ मीटर आहे. हे विमान १९ टन वजनाच्या साहित्याची वाहतूक करू शकते. ताशी ६४३ किलोमीटर वेगाने उड्डाण करण्याची क्षमता असलेले हे विमान खराब हवामानातही उड्डाण करू शकते. अमेरिका, भारतासह जगभरातील २३ हून अधिक देश या विमानाचा वापर करतात.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...