"मागचा आठवडा रुचिताने कंटेंट दिला, मग तरीही बाहेर गेली?" धनंजय पोवारचा सवाल; रोशन भजनकरबाबतही म्हणाला...
कोल्हापूर: बिग बॉस मराठीमधून रुचिता जामदारच्या एलिमिनेशनवर माजी स्पर्धकाची प्रतिक्रिया; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वातून विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी रुचिता जामदार हिचे एलिमिनेशन झाल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या एलिमिनेशननंतर मागील पर्वातील स्पर्धक धनंजय पोवारने एक व्हिडीओ शेअर करत संभ्रम व्यक्त केला आहे.
धनंजय पोवार म्हणाला, "बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर बघायला मिळालं की, रुचिता बाहेर पडल्या. पण मला असं वैयक्तिक वाटतंय की, याआधी रोशन भजनकरला खूप मतं होती. रोशन भाऊ बाहेर गेले आणि आता रुचिता बाहेर गेली. रुचिता कंटेंट देतेय, मागचा आठवडा पूर्ण रुचिताने कंटेंट दिलेला आहे. मग तरीही रुचिता बाहेर गेली?" असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. "हे काही पटलं नाही," असे कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आहे.
बिग बॉसच्या सहाव्या पर्वात अनेक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते. सध्या वाइल्ड कार्ड स्पर्धकांच्या एन्ट्रीने घरातील समीकरणे बदलली आहेत. राखी सावंतनंतर आणखी तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात प्रवेश केल्याने नवे तणाव निर्माण झाले आहेत. अशातच रुचिताचे एलिमिनेशन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
रुचिताचा माफीनामा
घराबाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणाली, "बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली. खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार."
रुचिताच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून, अनेकांनी हा निर्णय अनफेअर असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हा योग्य निर्णय असल्याचेही सांगितले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.