व्यापारावर परिणाम होण्याची चिंता; संयम आणि राजनैतिक उपाययोजनांचे आवाहन
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्थ वाढत असताना भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवित्र रमजान महिन्यात हा संघर्ष चिघळणे दुर्दैवी असून, त्यात झालेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल भारताने शोक व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, खाडी भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे एक कोटी भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
एक कोटी भारतीयांचा सुरक्षा प्रश्न
खाडी भागात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार सज्ज आहे. संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास स्थानिक भारतीयांशी सतत संपर्कात आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे वेळोवेळी जारी करण्यात येत आहेत. अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिंता
हा संघर्थ थेट भारताच्या व्यापारी आणि ऊर्जा पुरवठा साखळीशी जोडला गेला आहे. याच भौगोलिक क्षेत्रातून भारताचा मोठ्या प्रमाणात व्यापार आणि तेलपुरवठा होतो. त्यामुळे या भागात कोणताही मोठा व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतो, अशी चिंता मंत्रालयाने व्यक्त केली. अलीकडे व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर काही बेपत्ता झाल्याच्या घटनांवर भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे.
संयम आणि संवादाचे आवाहन
गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या या संघर्षात भारताने सुरुवातीपासूनच सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढवू नये, असे आवाहन केले होते. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती अधिक बिकट झाल्याने भारताने पुन्हा एकदा संघर्ष थांबवून संवाद आणि कुटनीतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी या भागातील इतर देशांच्या नेत्यांशी चर्चा करून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.