⚡ ब्रेकिंग News

आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया, सोनं-चांदीत मोठी घसरण; १० ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?

आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया, सोनं-चांदीत मोठी घसरण; १० ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विधानाला इराणकडून ‘फेक न्यूज’ म्हणत खोडून काढल्यानंतर बाजारात अस्थिरता; जाणून घ्या आजचे ताजे दर.

Gold Silver Rates Today : अमेरिका-इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ सुरू असून, आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केल्यानंतर इराणने हा दावा फेटाळून लावताच सोन्याच्या बाजारात तेजी आली, मात्र त्यानंतर पुन्हा घसरण झाली आहे.

आजचे सोने-चांदीचे दर (२४ मार्च २०२६):

२४ कॅरेट १० ग्रॅम सोने : १ लाख ३७ हजार ७३० रुपये

चांदी (१ किलो) : २ लाख १६ हजार ९०० रुपये

काल सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ७२० रुपये होता, तर चांदीचा दर २ लाख २५ हजार ५३० रुपयांवर होता. त्यानुसार आज सोन्यात सुमारे २ हजार रुपये तर चांदीत सुमारे ८ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे.

बाजारातील चढ-उताराची पार्श्वभूमी :

सकाळी बाजारपेठ उघडताच सोन्याचे दर १ लाख ३५ हजार रुपयांच्या घरात होते. मात्र, काही वेळातच ते साडेपाच हजार रुपयांनी वाढून १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर चांदीही १० हजार रुपयांनी वाढून २ लाख २६ हजार रुपयांच्या घरात गेली होती. यामुळे सुवर्णबाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

इराणच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा घसरण :

मात्र, ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा जो दावा केला होता, त्याला इराणने जोरदार प्रतिक्रिया दिली. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्था 'आयआरआयबी'ने (IRIB) ट्रम्प यांच्या विधानाला 'सायकोलॉजिकल ऑपरेशन्स' म्हणजेच 'मानसिक युद्धनीती' म्हणत खोडून काढले. तसेच, अमेरिकेसोबत कोणतीही बातचीत झालेली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली.

इराणच्या या वक्तव्यानंतर सोन्याचे दर पुन्हा अडीच हजार रुपयांनी घसरून १ लाख ३७ हजार ७३० रुपयांवर आले आहेत. तर चांदीच्या दरातही सहा हजार रुपयांची घसरण होऊन तो २ लाख १६ हजार ९०० रुपयांवर पोहोचला आहे.

पुढील काळात काय? :

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात ट्रम्प आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन युद्धविरामाची चिन्हे दिसू लागल्यास सोने-चांदीच्या बाजाराला पुन्हा तेजी मिळू शकते. मात्र, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत तणाव कायम राहिल्यास सोने-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...