⚡ ब्रेकिंग News

ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा वितुष्ट; राज ठाकरेंच्या तटस्थ भूमिकेने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली





  ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा वितुष्ट; राज ठाकरेंच्या तटस्थ भूमिकेने उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली

 स्वीकृत नगरसेवकापासून प्रभाग समितीपर्यंत; मनसे-उबाठा गटातील अंतर का वाढतंय?

ठाकरे बंधूंचा अबोला; राज ठाकरेंची 'तटस्थ' भूमिका उद्धव ठाकरेंना भोवणार?

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई महापालिकेत शिवसेना (उबाठा) गटाचे तीन स्वीकृत नगरसेवक झाले आहेत. यापैकी एक नगरसेवक मनसेकडे जावा, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र, उबाठा गटाने ही जागा मनसेला न देता स्वतःच्या पदरातच ठेवली. त्यानंतर याची भरपाई म्हणून काही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची वाटणी करताना मनसेला सामावून घेण्याची चर्चा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झाली होती. मात्र, प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने ही चर्चा फोल ठरली आहे.

प्रभाग समितीवर कसा होणार परिणाम?

मुंबई महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील तीन दिवसांत या निवडणुका होणार असून महापौर-उपमहापौर निवडीनंतरची ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात आहे. मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या गणितावर मोठा परिणाम होणार आहे.

प्रभाग समिती एस आणि टी 

उबाठा: ८ नगरसेवक

 मनसे: १ नगरसेवक (तटस्थ)

काँग्रेस: १

मविआ एकूण: ९

भाजप: ९

शिंदे गट: १

महायुती एकूण: १०

(मनसेच्या तटस्थतेमुळे ही प्रभाग समिती महायुतीकडे जाणार आहे. मनसे मविआसोबत असती तर संख्याबळ बरोबरीत जाऊन चिठ्ठीचा खेळ झाला असता.)

प्रभाग समिती एफ दक्षिण, एफ उत्तर 

 उबाठा: ६

 मनसे: १ (तटस्थ)

 काँग्रेस: १

 सपा: १ (भूमिका स्पष्ट नाही)

मविआ (सपासोबत असल्यास): ८

 भाजप: ५

शिंदे गट: ३

महायुती: ८

(सपा कुणासोबत जाणार हे स्पष्ट नाही. सपा मविआसोबत राहिली तरी बरोबरीत सामना होऊन चिठ्ठी निघेल किंवा महायुतीसोबत गेल्यास प्रभाग समिती महायुतीच्या पारड्यात जाईल.)

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत भेट; उद्धव ठाकरेंकडे पाठ

राज ठाकरे यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अंतर अधोरेखित झाले. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, "आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाही. निवडणुका संपल्या आहेत. चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही. काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटेन."

मुंबई महापालिका निवडणूक २०२६ निकाल (अंतिम)

- भाजप: ८९

- शिवसेना (उबाठा): ६५

- शिवसेना (शिंदे): २९

- काँग्रेस: २४

- मनसे: ६

- एमआयएम: ८

- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): ३

- समाजवादी पार्टी: २

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): १

- एकूण: २२७ / २२७

दरम्यान, प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेची तटस्थ भूमिका कायम राहिल्यास महाविकास आघाडीला अनेक प्रभाग समित्या गमवाव्या लागू शकतात. यामुळे ठाकरे बंधूंमधील हे वितुष्ट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...