⚡ ब्रेकिंग News

अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली?" रोहित पवारांच्या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया



अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली?" रोहित पवारांच्या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

"काल उठून वेगळंच बोलत होते... हा संभ्रम आहे"; रोहित यांच्या आरोपांवर मुंडे यांचा सावधपणा, राणेंचा पलटवा

बारामती विमान दु�र्घटनेप्रकरणी रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांना आता आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाल्याचा आरोप करत क्रिमिनल अँगलने तपासाची मागणी केली आहे. यावर बोलताना मुंडे यांनी रोहित यांच्या भूमिकेत 'संभ्रम' असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बारामती विमान दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. नागरी उड्डाणमंत्री, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकातील जवळीकीकडे बोट दाखवत त्यांनी अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाल्याचा आरोप केला. "काही लोकांच्या मते रेकी झाली होती. याची पक्की माहिती नसली तरी गुन्हेगारी अंगाने सखोल चौकशी व्हायला हवी," अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

रोहित पवारांच्या या आरोपांवर विचारले असता, धनंजय मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "मला याबाबत काही बोलणे उचित वाटत नाही. यासंदर्भात जे मांडत नाहीत, त्यांना अनुभव जास्त आहे. काल उठून हा विषय मांडत आहेत, पण परवा दादांच्याविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते. हा सगळा संभ्रम आहे," असे म्हणत मुंडे यांनी थेट टीकेऐवजी नेमकेपणाने भूमिका मांडली. यापुढे जाऊन ते म्हणाले, "विश्वास-अविश्वास हे आहेत. जशा गोष्टी समोर येतील तशा येतील. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं, नेमकं त्याला खरं की खोटं काय माहिती होतं?"

नितेश राणे यांचा टोला

दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपांवरून भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "रोहित पवार आता एव्हीगेशन एक्स्पर्ट झाले आहेत. तुमची माहिती फॉर्मल अथॉरिटीकडे द्या. रोहित पवार आता फक्त पायलट बनायचे बाकी आहेत," अशी ट्वीट करत राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

अंजली दमानिया प्रकरणावर भाष्य

यावेळी अंजली दमानिया यांच्या आरोपांबाबत आणि लोकायुक्तांनी दिलेल्या निकालावरही धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. "कृषी विभागातील खरेदीवरून रान पेटवण्याचा प्रयत्न झाला. कोर्टात खोटे पुरावे देण्यात आल्याने हायकोर्टाने दंड ठोठावून आम्हाला क्लीन चिट दिली. लोकायुक्तांनीही पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. अंजली दमानिया यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले, पण त्यातला एकही आरोप खरा ठरला नाही. हा माझ्याविरुद्धच्या षडयंत्राचाच भाग होता," असे मुंडे म्हणाले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...