विनापरवाना व नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कॅफेविरोधातील कारवाई सुरूच; कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा
सांगली | प्रतिनिधी :
विश्रामबाग परिसरात विनापरवाना तसेच नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कॅफेविरोधातील कारवाईचा धडाका विश्रामबाग पोलिसांनी कायम ठेवला आहे. या मोहिमेअंतर्गत 'सन 7' कॅफेवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी कॅफे चालक संदीप साऊबा मोरे (वय 27, रा. निलजी-बामणी, ता. मिरज) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली शहर व विश्रामबाग परिसरातील काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी अशा कॅफेविरोधात सातत्याने तपास आणि कारवाई सुरू केली आहे.या कारवाईदरम्यान पोलिसांनी 'सन 7' कॅफेची तपासणी केली असता, जोडप्यांना बसण्यासाठी बेकायदेशीरपणे स्वतंत्र व बंदिस्त केबिन तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच संबंधित कॅफे आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करत आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कॅफेवर कारवाई करत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरातील इतर कॅफेंचीही तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.