⚡ ब्रेकिंग News

"तुम्ही बाप का काढला?"; विधीमंडळ परिसरात भाजप-शिवसेना आमदारांची जुंगी



भास्कर जाधवांची 'जीभ घसरली', सचिन कल्याणशेट्टी भडकले; लग्नपत्रिका वाटपावरून रंगला वाद

"बाप काढायचा अधिकार कुणी दिला?"; विधानभवनात आमदारांची बाचाबाची

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आता विधानभवन परिसरातच दोन आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात हा वाद झाला. विधानसभा परिसरातील पोर्चमध्ये ही बाचाबाची पाहायला मिळाली.

नेमकं कारण काय?

उपलब्ध माहितीनुसार, विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह सोहळा १५ मार्च रोजी होणार आहे. या लग्नासाठी आमदारांचे खासगी सहाय्यक विधिमंडळ परिसरात लग्नपत्रिकांचे वाटप करत होते. याच पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला.

आमदार भास्कर जाधव यांनी विधीमंडळ आवारात पत्रिका वाटत असल्याने नाराजी व्यक्त करताना "सरकारचा बाप काढला" असा उल्लेख केला. या वादळी वक्तव्यानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पारा चढला. त्यांनी थेट भास्कर जाधव यांना धारेवर धरत "तुम्ही बाप काढलाय, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही बाप काढला तर मीही काढेन," अशा शब्दात जोरदार जाब विचारला. यावर भास्कर जाधव यांनी "तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा," असे प्रत्युत्तर दिले.

कल्याणशेट्टी काय म्हणाले?

या प्रकारानंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. "भास्कर जाधव कर्मचाऱ्यांना रागवत होते. मी सभागृहात प्रवेश करत असताना ते सरकारचा बाप काढत होते. अपशब्द वापरत होते, ते माझ्या कानावर पडले. यासंदर्भात मी त्यांना तक्रार करा, असे सांगितले. आपण इथे परिवार म्हणून राहतो. लग्नपत्रिका एकमेकांना देत असतो. त्यासाठी कोणाचा किंवा सरकारचा बाप काढणं योग्य नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्याने ते असे वागत असावेत. हे वागणं चुकीचं होतं," असे कल्याणशेट्टी म्हणाले.

दरम्यान, या वादामुळे विधीमंडळ परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...