⚡ ब्रेकिंग News

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे सपत्नीक उपस्थित; ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांच्या कीर्तनाचा लाभ

 

दहिवडी | प्रतिनिधी 

दहिवडी (ता. माण) येथे सौ. सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला झी टॉकीज प्रस्तुत आषाढी वारी विशेष कीर्तन सोहळा शनिवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सपत्नीक उपस्थित राहून हजेरी लावली.

यावेळी ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून संतपरंपरा, आषाढी वारीचे आध्यात्मिक महत्त्व, विठ्ठलभक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश उपस्थित भाविकांना दिला. त्यांच्या विचारप्रवर्तक निरूपणाने उपस्थित वारकरी आणि नागरिक मंत्रमुग्ध झाले.

कीर्तन सोहळ्यात संतांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक एकात्मता, सद्भावना आणि अध्यात्माचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला. मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून विठ्ठलनामाच्या गजरात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पांडुरंगाच्या चरणी राज्याच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...