⚡ ब्रेकिंग News

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वस्वी” या अहंकारात भाजपने राहू नये - शरद पोंक्षेंचा नागपुरातून इशारा

भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर संघ दहा भाजप उभ्या करू शकतो”; मराठी अभिनेते शरद पोंक्षेंचे सूचक वक्तव्य

नागपूर : मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे. “आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत, आम्हीच सर्वस्वी” या अहंकारात भाजपने राहू नये, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भाजपची आई असल्याचे सांगत पोंक्षे म्हणाले, “भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर संघ अशा दहा भाजप उभ्या करू शकतो. पुन्हा दहा-पंधरा वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल, पण कट्टर हिंदुत्ववादी दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे.”

शरद पोंक्षे हे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रविवारी नागपुरात आयोजित ‘रामस्मरण व्याख्यानमाले’त बोलत होते. ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर ते बोलताना म्हणाले, “आज भारतात हिंदूंचे सण-उत्सव मोठ्या थाटात साजरे होत आहेत. ‘गवनि म्हणा आम्ही हिंदू आहोत’ असं म्हणण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आली आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघालाही जाते.”

ते पुढे म्हणाले, “शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपने हे लक्षात ठेवावे की, जर भाजप काँग्रेससारखी झाली तर संघ दहा अशा भाजप उभ्या करू शकतो.”

पोंक्षे यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करताना म्हटले, “मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. ज्यांनी ती जाळली, त्यांनी ती वाचलीच नाही. वाचली असती तर ते जाळू शकले नसते.”

हे व्याख्यान रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचा हा भाग होता.

शरद पोंक्षेंचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. भाजप आणि संघ परिवारातील संबंध आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत त्यांनी दिलेला हा सूचक इशारा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...