पुण्यातील खाऊ गल्लीत धक्कादायक घटना; वेळीच मदत मिळाल्याने जिवित वाचले, उपचार सुरू
पुणे: पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. नोकरी गमावल्यानंतर आलेल्या मानसिक तणाव आणि नैराश्यातून ४१ वर्षीय आदित्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी असून, सध्या पुण्यातील भोसले नगर परिसरात राहत होते. नोकरी गेल्यामुळे ते मानसिक दबावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी एफसी रोडवरील खाऊ गल्लीत हे टोकाचे पाऊल उचलले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूच्या नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ उपस्थित नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना मदत करत जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेळीच मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. मात्र, या घटनेमागे इतर काही कारणे आहेत का, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रूर हल्ला
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री दुसरी एक धक्कादायक घटना घडली. ३२ वर्षीय सीताराम आसाराम आळंजकर या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी निर्जन शेतात नेून धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या.
सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी सीताराम यांना जबरदस्तीने शेतात नेले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रस्त्यावर सोडून आरोपी फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत बराच वेळ ते घटनास्थळी पडून होते. त्यांच्या चुलत भावाने त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिस तपास सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.