उपांत्य फेरी गाठून देणाऱ्या खेळीनंतर संजूचं हेल्मेट फेकून केलेलं सेलिब्रेशन पडू शकतं महागात, आयसीसीच्या नियमांनुसार होऊ शकतो दंड.
क्रांती न्यूज वृत्त:
भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने पराभव करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत धडक मारली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर उपांत्य फेरी गाठणारा भारत हा चौथा संघ ठरला. या रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय असूनही चर्चेला उधाण आलंय ते संजू सॅमसनच्या एका वेगळ्याच कृतीमुळे.
वेस्ट इंडिजने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने चार चेंडू शिल्लक असताना पार केले. या यशात संजू सॅमसनची ९७ धावांची खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली. मात्र, विजयी चौकार ठोकताच संजूने आपले हेल्मेट मैदानावर जोरदार फेकून दिले. या अनोख्या सेलिब्रेशननंतर आता आयसीसी संजूवर शिस्तभंगाची कारवाई करू शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, खेळाडूंनी बॅट किंवा हेल्मेट मैदानावर फेकणे हे अयोग्य वर्तन मानले जाते. यामुळे इतर खेळाडू, पंच किंवा मैदानावरील व्यक्तींना दुखापत होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा कृतीबद्दल खेळाडूवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. यामध्ये आर्थिक दंड, डिमेरिट पॉइंट्स किंवा निलंबनाची शक्यता देखील असू शकते.
दरम्यान, या सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनच्या खेळीचे कौतुक केले. ते म्हणाले, "संजू सॅमसन हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. त्याच्या प्रतिभेवर आमचा विश्वास होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती देणे महत्त्वाचे होते, पण आम्हाला माहित होते की जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा संजू पुढे येऊन कामगिरी करेल."
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.