⚡ ब्रेकिंग News

महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?

 

 

महायुतीत सीट शेअरिंग फायनल; रायगड भाजपला, कोल्हापूर-पुणे राष्ट्रवादीकडे, रत्नागिरीत शिवसेनेचा अध्यक्ष

महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) सत्ता स्थापनेचा महायुतीतील तिढा सुटला आहे. मुंबई : महायुतीच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार, अशी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेत पहिली सव्वा वर्षे भाजपचा अध्यक्ष असणार आहे. याशिवाय अडीच वर्षे शिवसेना, तर सव्वा वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणार अशी माहिती आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर तिकडे रत्नागिरीत शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे. माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती होणार, अशी देखील माहिती आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदाच्या सत्तेची भाजपला खात्री; भाजपने केली विजयी मेळाव्याची तयारी

एकीकडे महायुतीमध्ये चर्चा प्रलंबित असताना दुसरीकडे मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपचीच वर्णी लागेल, अशी खात्री असून भाजपने विजयी मेळाव्याची तयारी देखील सुरू केल्याचे बघायला मिळाले आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी १२ मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आपलाच अध्यक्ष बसणार, याची खात्री भाजपला झाली असून भाजपने विजयी मेळाव्याची तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न असफल ठरताना दिसत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शिवसेनेला दूर ठेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू केली आहे. अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर लगेचच अलिबागमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विजयी मेळावा घेतला जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादीचा वरचष्मा; ९ पैकी ४ भाजप, ४ राष्ट्रवादीकडे

परभणी जिल्ह्यातील ९ पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींची निवड प्रक्रिया आज पार पडली, ज्यामध्ये महायुतीमधील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. ९ पैकी भाजपने ४, राष्ट्रवादीने ४ तर एका पंचायत समितीवर अपक्षाने वर्चस्व मिळवले आहे.

परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपच्या आयोध्या खिस्ते सभापती तर सोनू दराडे या उपसभापती झाल्या आहेत. सेलू ही भाजपकडे गेली आहे. सेलूत विजयमाला डोंबे सभापती तर उपसभापती सुलभा घुगे, गंगाखेडमध्ये भाजपचे मनोज मुंडे सभापती तर उपसभापती सारिका खांडेकर, पालममध्ये रेवता ढाले सभापती तर सुरेखा बडे या उपसभापती झाल्या आहेत. तर पूर्णा पंचायत समितीत अपक्ष उज्वला पिसाळ या सभापती झाल्या आहेत, तर उपसभापती पदी काशीनाथ काळबांडे हे विजयी झाले आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पाथरीत येथे सुनीता डुकरे यांना सभापती तर उपसभापती म्हणून सचिन अंभोरे यांची निवड केली आहे. मानवतमध्येही राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ सभापती तर सूरज काकडे हे उपसभापती झाले आहेत. परभणी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे रवी चव्हाण हे सभापती झाले आहेत. तर ठाकरे गटाचे विवेक पिसाळ हे उपसभापती झाले आहेत. तिकडे सोनपेठमध्येही राष्ट्रवादीच्या माया मुजुमले या सभापती तर उपसभापती पद्मसिंह देशमुख यांची वर्णी लागली आहे.

सर्वच ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवडी झाल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आला. परभणीच्या पूर्णा आणि परभणी पंचायत समितीत ठाकरे गटाने राष्ट्रवादीला मदत केली, ज्यात उपसभापती हे ठाकरे गटाला मिळाले आहेत. राजकारणात काहीही होत असते, असे विधान परभणी पंचायत समिती निवडीनंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...