'घरातून हाकलून देईन' म्हणत सुनेने केला एवढा त्रास; कंटाळून सासऱ्याने घेतला विष, सोलापूरच्या बार्शीत खळबळ
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेच्या (Solapur Crime News) जाचाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्ध सासऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी येथील उपळाई रोड परिसरात राहणारे सर्जेराव शंकर नायकुडे (वय ७३) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सुनेच्या सततच्या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
फिर्यादी महेश नायकुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उमेश नायकुडे यांची पत्नी सारिका उमेश नायकुडे ही किरकोळ कारणांवरून सासरे सर्जेराव नायकुडे यांचा वारंवार अपमान करत होती आणि "तुला घरातून हाकलून देईन" अशी धमकी देत होती. या सततच्या त्रासामुळे सर्जेराव नायकुडे मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या (Solapur Crime News) केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, महेश नायकुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात आरोपी सून सारिका नायकुडे हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
सुनेच्या सततच्या जाचाला आणि घरातून हाकलून देईन या धमकीला कंटाळून सर्जेराव शंकर नायकुडे या वृद्धाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने बार्शीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुनेविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे बार्शीत आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र, गेल्या काही काळापासून घरात कौटुंबिक वाद होत होते. सून आणि सासरे यांच्यात वाद होत होते. त्यातच सुनेकडून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात असे. साध्या साध्या गोष्टींवरून त्यांचा अपमान करणे, त्यांना टोमणे मारणे आणि सर्वात भयानक म्हणजे "तुला घरातून हाकलून देईन" अशी धमकी देणे, यामुळे सासरे प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
१० मार्च रोजी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घराचा आधारवड असलेल्या सासऱ्याने सुनेच्या रोजच्या धमकावण्याला आणि अपमानाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने वाचवण्याचे प्रयत्न झाले, पण यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा महेश नायकुडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.