⚡ ब्रेकिंग News

होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'

  होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राइक, १६ जहाजांना उडवलं, इराणही संतापला, 'तेलाचा एकही थेंबही जगाला...'

 होर्मुझवर अमेरिकेचा भीषण हल्ला; इराणची १६ युद्धनौका बुडाल्या, तेलपुरवठा बंद करण्याचा इशारा

अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असून संपूर्ण जग इंधन संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही या युद्धात महत्त्वाची ठरली आहे. वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असून संपूर्ण जग इंधन संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही या युद्धात महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेने या सामुद्रधुनीत इराणवर जोरदार प्रहार केला. मंगळवारी, समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या १६ जहाजांना उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तर, इराणने आक्रमक पवित्रा घेत जगाचा तेल पुरवठा कायमचा बंद करण्याची उघड धमकी दिली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा स्ट्राईक

जगातील २० टक्के तेल वाहतूक होणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) जवळ अमेरिकन सैन्याने ही मोठी कारवाई केली. अमेरिकेचा दावा आहे की, इराण या भागात समुद्री सुरुंग पेरत होता. इराणचे हे कृत्य जागतिक व्यापारासाठी घातक ठरले असते. अमेरिकेने या कारवाईचे व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इशारा दिला आहे की, जर इराणने हे सुरुंग त्वरित हटवले नाहीत, तर अमेरिका असा हल्ला करेल जो जगाने कधीही पाहिला नसेल.

शत्रूला एक लिटर तेलही मिळू देणार नाही: इराणचा पलटवार

अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने संपूर्ण जगाला वेठीस धरण्याची तयारी सुरू केली आहे. "आम्ही या भागातून होणारी सर्व तेल निर्यात रोखून धरू. आमच्या शत्रूंपर्यंत तेलाचा एक थेंबही पोहोचू देणार नाही," असा गर्भित इशारा इराणने दिला आहे. इराणच्या या निर्णयामुळे आखाती देशातून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडण्याची भीती व्यक्त होत आहे.

चर्चेचे दरवाजे बंद, इस्रायलवरही हल्ले सुरू

इराणच्या नेत्यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. युद्ध अमेरिकेने केले, मात्र ते आम्ही संपवणार असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिका-इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू आहेत. अमेरिका-इस्रायलच्या रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणने याआधी केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...