पश्चिम आशियातील संघर्षाचे परिणाम भारतावर स्पष्ट; गॅस टंचाईसह तेलाच्या वाढत्या किमतींबाबत ज्येष्ठ नेत्यांनी केली भीती व्यक्त.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला चार आठवडे पूर्ण झाले आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, भारतालाही युद्धाची झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उशीरा भाष्य केल्याबद्दलही त्यांनी नाराजी दर्शविली.
शरद पवार काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले की, युद्ध सुरू असताना भारतात त्याची झळ बसत आहे. गॅस टंचाईसह अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, डॉलरच्या तुलनेत रुपया ९४.०१ पर्यंत घसरला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे.
पवार यांनी पुढे चिंता व्यक्त करताना म्हटले की, "युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर पुढील काळात चित्र वेगळं असू शकतं. टंचाई अधिक तीव्र होऊ शकते."
पंतप्रधानांच्या भाष्यावर नाराजी :
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धावर उशीरा भाष्य केल्याबद्दलही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, "एवढ्या दिवस युद्ध सुरू असताना भारतात त्याची झळ बसत आहे. मात्र यावर पंतप्रधानांनी उशीरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही."
महाविकास आघाडीचे आभार :
यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल आभारही मानले. मवि आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने त्यांना पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया :
शरद पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "महाविकास आघाडी पुष्पगुच्छप्रमाणे अशीच टवटवीत राहो."
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारण योग्य ठिकाणी ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब चांगले मित्र होते. दोघेही केव्हाही सूडबुद्धीने वागले नाहीत. स्टेजवर पवारसाहेबांनी राजकारण केलं, मात्र खाली आल्यावर त्यांनी संबंध जपले."
युद्धाचा भारतावर काय परिणाम?
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने तेल-वायू पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९४.०१ पर्यंत घसरला आहे.
गॅस टंचाईसह अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जात असून, युद्धाचे परिणाम भारतावर दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.