⚡ ब्रेकिंग News

गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे राहताना माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप, ‘वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने सर्वप्रथम माफी मागावी’

“सिलिंडर बुक करा, २५ दिवसांत येईल” म्हणणाऱ्या आमदाराला रोहिणी खडसेंचा थेट इशारा; अकोल्यातील दुर्दैवी घटनेनंतर राजकीय खळबळ

अकोला: गॅस सिलिंडर मिळण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड रांगेत उभे राहताना एका माजी सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता तीव्र निशाणा साधला.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “‘सिलिंडर बुक करा, २५ दिवसांत येईल’ असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वप्रथम माफी मागायला हवी. जे लोक सांगतात की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत, त्यांना हा फोटो दाखवा!”

काही दिवसांपूर्वी विधिमंडळात काँग्रेस आमदारांच्या आंदोलनादरम्यान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी “सिलिंडर बुक करा, २५ दिवसांत मिळेल” असे विधान केले होते. त्यावरून रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

सोशल मीडियावर रोहिणी खडसेंचे पोस्ट

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत, त्यांना जरा हा फोटो दाखवा! अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे असताना जीव गमवावा लागला.”

या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. गॅस सिलिंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना आणि रोहिणी खडसेंची तीव्र प्रतिक्रिया यामुळे महाराष्ट्रात गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू झाला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...