⚡ ब्रेकिंग News

‘पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही...’ विशाल पाटील यांनी अचानक का केली चिंता?


 महिलांना ३३ टक्के आरक्षणामुळे आमदार-खासदारही महिला होणार; सांगलीत गावाच्या नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांचे विधान, उपस्थितांमध्ये हशा

सांगली: सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात महिलांच्या आरक्षणाबाबत बोलताना आपल्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. “पुढील निवडणुकीत आम्ही खासदार असणार की नाही, याची खात्री नाही,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना हसवले.

खानापूर तालुक्यातील मौजे मेंगाणवाडीचे नाव बदलून मौजे शिवशिवापूर असे करण्यात आले. या नामकरण सोहळ्यात बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, “आता कार्यक्रमात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी एवढ्या संख्येने महिला फक्त देवाच्या कार्यक्रमाला येत असत. आज गावाच्या नामकरणाच्या कार्यक्रमातही पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त दिसत आहे.”

ते पुढे म्हणाले, “आता ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. यामुळे आमदार, खासदारही महिला होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस आम्ही खासदार असेल की नाही, याची खात्री नाही.”

विशाल पाटील यांनी मतदारसंघातील ७५० गावांमध्ये प्रत्येक गावात जाणे शक्य नसल्याचेही सांगितले. “सहा महिने इथे राहून एक गाव केले तरी पाच वर्षांत ७५० गावे होत नाहीत,” असे ते म्हणाले. ते म्हणाले, “मी दिल्लीत होतो, विश्वजीत कदमांच्या हेलिकॉप्टरमधून इथे कार्यक्रमाला आलो. पुढील लोकसभेचा प्रचार या कार्यक्रमातूनच आतापासून सुरू करतो,” असे म्हणताच उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकच हशा पिकला.

कार्यक्रमात उपस्थित

या नामकरण सोहळ्यात शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर आणि काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

पार्श्वभूमी

विशाल पाटील हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगलीची जागा वादग्रस्त ठरली होती. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष झाला होता. विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आणि चंद्रहार पाटील यांना एकतर्फी पराभूत केले. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

सध्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आले असून, येत्या काळात विधानसभा आणि लोकसभेतही महिलांसाठी आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी हे विधान केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...