⚡ ब्रेकिंग News

पुण्याच्या बससाठी तिघे दुचाकीवर निघाले, भरधाव कारने उडवलं; वडील-मुलगी ठार, दुसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज

पुण्याच्या बससाठी तिघे दुचाकीवर निघाले, भरधाव कारने उडवलं; वडील-मुलगी ठार, दुसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज

अमरावतीत भीषण अपघात; मद्यधुंद कारचालकाने दिली धडक, घटनास्थळावरून 

अमरावती : शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या बसला सोडण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर शोकांतिकेचा डोंगर कोसळला आहे. रविवारी रात्री भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

मायानगर परिसरातील रहिवासी गजानन श्रीराम माकोडे (वय 55) हे आपल्या दोन मुली सपना (वय 24) आणि प्रियंका (वय 23) यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. मुलींना पुण्याकडे जाणाऱ्या बससाठी ट्रॅव्हल्स स्टॉपवर सोडण्यासाठी ते घरातून निघाले होते. जुना बायपास रोडवरील आनंद मार्बल फॅक्टरीसमोर असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही ५० ते ६० फूट अंतरावर फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान डॉक्टरांनी सपना माकोडे आणि गजानन माकोडे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रियंका माकोडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघात घडविणाऱ्या कारमध्ये दोन तरुण होते. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर कारमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. राजापेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कारचालकाचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेमुळे माकोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...