⚡ ब्रेकिंग News

20 वर्षांपासून 'एक बंधन, रक्षाबंधन' हा कौतुकास्पद उपक्रम, देशभक्तीसाठी रोहित आचरेकरांचा डोंबिवली ते कारगिल असा प्रवास!


  'शिवराष्ट्र – राष्ट्र प्रथम, वीर सर्वोपरि' या विचाराने 2252 किमीचा बाईक प्रवास; दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन पूर्णत्वास आला

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

ठाणे - भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘एक बंधन, रक्षाबंधन’ या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील रोहित आचरेकर (Rohit Acharekar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीची अनोखी ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. रोहित आचरेकर यांच्या ‘वे टू कॉज रायडर्स क्लब’ तर्फे गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ च्या माध्यमातून या उपक्रमाला सहकार्य करत आहेत. देशाच्या सीमेपासून डोंबिवलीपर्यंत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश पोहोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.

यंदा ‘शिवराष्ट्र – राष्ट्र प्रथम, वीर सर्वोपरि’ या विचाराला समर्पित असलेल्या उपक्रमांतर्गत डोंबिवली ते कारगिल असा २२५२ किलोमीटरपेक्षा अधिक चा प्रवास करत देशभक्तीपूर्ण राईडला सुरुवात करण्यात आली

५ ऑगस्ट रोजी कारगिल येथे सुमारे १००० स्क्वेअर फूट चा भव्य तिरंगा फडकवण्यात आला, तर विजयपथावर १२ स्क्वेअर फूट आकाराचे ४२ तिरंगे फडकवण्यात आले. कारगिलपासून सुरू झालेल्या बाईक राईडमध्ये लेह, तुरतुक, पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला आणि लामायुरू असा प्रवास करत प्रत्येक ठिकाणी देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ८० स्क्वेअर फूट तिरंग्याचे Hand Hoisting करण्यात आले.

या प्रवासादरम्यान २८ ऑगस्ट रोजी कारगिल येथे भारतीय सैनिकांसमवेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. वीर जवानांच्या हातावर राखी बांधून जवानांप्रती असलेले कृतज्ञतेचे बंध आणखी दृढ करण्यात आले. हा उपक्रम देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, जवानांचा बलिदान आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या भावनांना अभिव्यक्त करतो.

रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश घेऊन हा संपूर्ण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा सहभाग व उत्साह या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

कारगिलपासून सुरू झालेला हा देशभक्तीचा प्रवास पूर्ण करून रोहित आचरेकर आणि त्यांचे साथीदार आज पुन्हा डोंबिवलीत दाखल झाले. सीमेवर तिरंगा फडकवून तसेच जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करून सुरू झालेला हा प्रवास डोंबिवलीचा मानबिंदू असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन पूर्णत्वास आला आहे.

देशाच्या सीमेपासून डोंबिवलीपर्यंत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश पोहोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

गेली २० वर्षे रोहित आचरेकर आणि त्यांचे सहकारी या उपक्रमाद्वारे देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवत आहेत. रक्षाबंधनाच्या पावन सणानिमित्त देशाच्या सीमेवर जाऊन जवानांना राखी बांधणे आणि तिरंग्याचा सन्मान करणे, ही एक अनोखी परंपरा त्यांनी जपली आहे.

उपक्रम: 'एक बंधन, रक्षाबंधन' – २० वर्षांची परंपरा

प्रवास: डोंबिवली ते कारगिल – २२५२ किमी

रक्षाबंधन: २८ ऑगस्टला कारगिल येथे जवानांसोबत

तिरंगा: १५ ऑगस्टला १००० स्क्वेअर फूट तिरंगा फडकवला

सहभाग: वे टू कॉज रायडर्स क्लब, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...