क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे अंतरवाली सराटी येथील उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या आज आठव्या दिवशी त्यांनी राज्य सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिंदेंना 'लबाड' म्हणत, "एकनाथ शिंदेंनी पाप केलं आहे. त्यांना गोरगरीब मराठ्यांचा खूप तळतळाट लागणार," असा गंभीर आरोप केला आहे .
जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला की, ते सर्वांना वेड्यात काढत आहे. ते म्हणाले, "सरकार वेड्यात काढत आहे, आम्ही जातो आणि ते ऐकत नाहीत. २०२३ पासून २०२६ पर्यंत वेळ नाही तर काय दिलं?" .
जरांगे पाटील यांनी भाजपवरही टीका केली. ते म्हणाले, "भाजपमध्ये सहा गट आहेत. प्रत्येकाला वाटते त्याचं नाव येऊ नये. त्यांच्यात ओढाताण आहे. भाजपमध्ये एकमेकांना संपवत आहेत" .
त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेत्यांच्या बैठकांवरही टीका केली. "संभाजीनगरला जाऊन नुसतं बैठका घ्यायच्या. मिडीयात दाखवायचं आणि तातडीने मंत्री फडणवीस यांच्याकडे गेलो काहीतरी आदेश होण्याचा अंदाज आहे, असं फक्त दाखवायचं. जसे काही गोकुळात राहतात आणि तिथे बसून दही काढतात का?" असा टोलाही त्यांनी लगावला .
जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरही टीका केली. ते म्हणाले, "लाडकी बहीण नीट बोलत नाही, ती चप्पल घेऊन तयार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अनुदान नाही, पिक विमा नाही" .
ते पुढे म्हणाले, "शिंदेंनी लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण त्यांना खपली नाही. तर फडणवीस यांनी लाडकी दीदी आणली" .
जरांगे पाटील यांनी मंत्री संजय शिरसाट यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "शिंदेंचा गुरु शिरसाट आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका, ही जात संयमी आहे, तऱ्हाला लागली तर फार विचित्र आहे. सरकारचा डाव आहे" .
"ओबीसींचा टक्का आम्हाला नको," असेही त्यांनी स्पष्ट केले .
चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करताना जरांगे म्हणाले, बावनकुळे यांचं माझं लागलं होतं तर त्याच्या विरोधात भाजपच्या काही लोकांनी माझ्याकडं गबाळ आणून ठेवल्याचे" .
गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत, तर मराठा समाज आक्रमक झाला आहे .
एकनाथ शिंदेंवर हल्ला: 'पाप केलं, गोरगरीबांचा तळतळाट लागणार'
भाजपवर टीका: 'सहा गट, एकमेकांना संपवत आहेत'
लाडकी बहीण योजनेवर: 'शिंदेंना खपली नाही, फडणवीसांनी दुसरी आणली'
ओबीसी आरक्षण: 'आम्हाला ओबीसींचा टक्का नको'
उपोषण सुरूच: 'मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही'

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.