⚡ ब्रेकिंग News

ऑस्करवाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर! धर्मेंद्र यांना 'इन मेमोरियम'मध्ये न घेतल्याने चाहत्यांची आगपाखड


 ऑस्करवाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर! धर्मेंद्र यांना 'इन मेमोरियम'मध्ये न घेतल्याने चाहत्यांची आगपाखड

ठळक बातम्या:

 ९८व्या ऑस्कर सोहळ्यात 'इन मेमोरियम' विभागात धर्मेंद्र यांचा समावेश नाही

 नोव्हेंबर २०२५ मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी घेतला होता अखेरचा श्वास

 'हा फक्त हॉलिवूडचा शो...' म्हणत चाहत्यांनी व्यक्त केला संताप

लॉस एंजेलिस: ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा (ऑस्कर) नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या सोहळ्यात 'इन मेमोरियम' या विशेष विभागात गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या ज्येष्ठ कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि 'ही-मॅन' म्हणून लोकप्रिय असलेले धर्मेंद्र यांचे नाव या यादीत नसल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ऑस्करमध्ये कुणाला वाहिली श्रद्धांजली?

ऑस्करच्या 'इन मेमोरियम' विभागात यंदा रॉबर्ट रेडफोर्ड, रॉब रायनर यांसारख्या हॉलिवूड दिग्गजांना विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली. बार्बरा स्ट्रीसँड यांनी रॉबर्ट रेडफोर्ड यांना तर बिली क्रिस्टल यांनी रॉब रायनर यांना आदरांजली अर्पण केली. राहेल मॅकअॅडम्स यांनी कॅनेडियन अभिनेत्री डायन कीटन यांना श्रद्धांजली दिली. मागील वर्षी हा विभाग अधिक सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न ऑस्कर आयोजकांनी केल्याचे सांगितले जात असतानाच धर्मेंद्र यांची मात्र चूक झाली.

भारतीय चाहत्यांचा संताप

नोव्हेंबर २०२५ मध्ये धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. पाच दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याला ऑस्करमध्ये दुर्लक्षित केल्याने चाहते संतापले आहेत. सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले, "ऑस्कर सोहळ्यात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या व्यक्तींची यादी प्रदर्शित करण्यात आली. तरीही, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सिनेसृष्टीसाठी समर्पित केलं, अशा धर्मेंद्र या महान भारतीय अभिनेत्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. जेव्हा आपल्या आदर्श व्यक्तींना कोणत्याही प्रकारची दखल मिळत नाही, तेव्हा मग या सोहळ्याचा इतका गाजावाजा कशासाठी? शेवटी, हा प्रामुख्यानं हॉलिवूडचाच सोहळा आहे, खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय सोहळा नाही."

इरफान, ऋषी यांना मिळाला होता सन्मान

यापूर्वी इरफान खान आणि ऋषी कपूर यांसारख्या भारतीय कलाकारांना ऑस्करच्या 'इन मेमोरियम' विभागात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याबाबत झालेल्या या दुर्लक्षामुळे चाहते अधिकच नाराज आहेत. ऑस्कर आयोजकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले आकर्षण वाढवण्याचे प्रयत्न केले असले तरी, धर्मेंद्र यांचा विसर पडल्याने हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...