ठळक बातम्या:
१६ ते १९ मार्चदरम्यान राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट
उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय पश्चिमी चक्रावळीचा परिणाम महाराष्ट्रावर
पुणे: राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत असून, भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. १६ ते १९ मार्च दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात सध्या सक्रिय असलेल्या पश्चिमी चक्रावळीचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१६ मार्च: सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट
१७ मार्च: सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट
१८ मार्च: सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट
१९ मार्च: नंदुरबार, धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट
उर्वरित बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
तापमानातील बदल
मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.